लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम तथा नर्मदा काठावरील अनेक गावांना विकासाची प्रतिक्षा आहे. बहुतांश गावांमध्ये अंशत: विकास कामे झाले असले तरी तो तेवढ्यापुरता दरवळणारा गंध ठरतो. गंध जसा क्षणिक, तसा हा विकासही तेथील नागरिकांसाठी क्षणिक ठरत आहे. नर्मदा नदी काठावील पौला व अन्य गावांपर्यंत रस्ते पोहोचले असले तरी अल्पावधीतच हे रस्ते खराब झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या नशिबी पायपीटच आली आहे.धडगाव तालुक्यातील कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पौला व अन्य गावांमध्ये काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे झाले. परंतु मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. कोट्यवधीचा निधी खचू करुन सन २००८-०९ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता झाला. परंतु कात्री ते पौला दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी पूल तुटून भगदाड पडले. तर ठिकठिकाणी भरावही खचल्याने परिसरातील सात गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे येथील रहिवाशांना पायवाटेचा आधार घेऊन तब्बल २५ किलो मिटरचा फेरा मारून कात्री किंवा खुंटामोडी ही गाठावी लागत आहे. धडगांव अथवा मोलगी येथे जाण्यासाठी वाहन मिळत असते. तेथील नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागत असून सविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
पायवाटाच मांडतात जनजीवनाच्या व्यथा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:41 IST