शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

खेतिया परिसरात बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील भडगोन परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे़ यामुळे वनविभागातर्फे याठिकाणी २ पिंजरे व ट्रॅप ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील भडगोन परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे़ यामुळे वनविभागातर्फे याठिकाणी २ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे़ भडगोन रस्त्यालगत रजियोद्दीन शेख व फहीमोद्दीन शेख यांच्या शेतात दोन बिबटे दिसून आल्यानंतर ही मोहिम सुरु करण्यात आली आहे़शेख यांच्या शेतातील रखवालदाराला गेल्या आठवड्यात दोन बिबटे रात्री दिसून आले होते़ त्याने ही माहिती शेतमालकांना दिली होती़ याबाबत वनविभागाचे पानसेमल वनमंडळाचे अधिकारी मंगेश बुंदेला, खेतिया वनपरिक्षेत्र सहायक राजू पाटील यांना कळवण्यात आले होते़ त्यांनी याठिकाणी पाहणी केल्यावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते़ यानंतर दक्षता म्हणून तातडीने पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत़दरम्यान या भागात बिबट्याचा सातत्याने संचार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांजवळ येणारा बिबट्या आतमध्ये जात नसल्याचे कॅमेºयातून दिसून आले आहे़ तसेच दिवसभर या भागात शेतीची कामे सुरु असतात त्यावेळी बिबट्या दिसून येत नाही़ परंतू रात्री बिबट्यांचा संचार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ गेल्या महिन्यात खेतिया परिसरातील बांद्रीयबड येथे दोन बिबटे वनविभागाने लावलेल्या पिंजºयात कैद झाले होते़ त्यानंतर पु्न्हा या भागात बिबटे फिरत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ वनविभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कता बाळण्याचा इशारा दिला आहे़ त्यानुसार जनजागृती सुरु आहे़सेंधवा वनविभागाचे अधिकारी डीएफओ श्रीराम मेहता , एसडीएफओ विजय गुप्ता, वनमंडळ अधिकारी मंगेश बुंदेला, खेतियाचे राजू पाटील यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील यांचे पथक बिबट्यांचा शोध घेत आहे़महाराष्ट्र व मध्यप्रदेश हद्दीत बिबट्या फिरत असल्याची माहिती असल्याने दोन्ही राज्यातील वनविभागाचे पथक बिबट्यावर लक्ष ठेवून आहे़ नर आणि मादी बिबट्या असण्याचा अंदाज आहे़