नंदुरबार: थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रात्री सातपायरी घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्याने घाट रस्ता बंद झाल्याने तोरणमाळचा संपर्क तुटला आहे. काल रात्री पासून होत असलेल्या पावसामुळे तोरणमाळ पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या घाट रस्त्यात भले मोठे झाड आणि दरड कोसळल्याने घाट मार्ग बंद झाला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे सातपायरी घाटात ठीक ठिकाणी डोंगरावरील मलबा रस्त्यावर आल्याने रस्त्यावर वाहने चालवितांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पर्यटकासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने माती आणि दरड बाजूला करण्यात चे काम तात्काळ करण्यात येणार असून दुपार पर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती तोरणमाळ वनविभागाचे वनपाल दिलीप केळकर यांनी दिली.