नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अॅड़ के़सी़ पाडवी तब्बल सहा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच डॉ़ हिना गावीत या पिछाडीवर आहेत़ तिसऱ्या फेरीअखेरीस अॅड़ के़सी़ पाडवी यांना ३३ हजार १२५ तर डॉ़ हिना गावीत यांना २७ हजार २७ इतकी मत पडलेली ेआहेत़ एकूण २७ फेºया होणार आहेत़दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़
नंदुरबारात सहाव्या फेरीअखेर के़सी़ पाडवी सहा हजार मतांनी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 09:36 IST