कोंडाईबारीत खाजगी बस दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:19 PM2020-10-21T21:19:53+5:302020-10-21T21:21:54+5:30

पाच ठार : ३५ जखमी, एक मयत व १७ जखमी जळगाव जिल्ह्यातील

In Kondaibari, a private bus crashed into a ravine | कोंडाईबारीत खाजगी बस दरीत कोसळली

कोंडाईबारीत खाजगी बस दरीत कोसळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खामचौंदर शिवारातील पुलावरून खाजगी बस चाळीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार तर ३५ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात खाजगी स्लीपर कोच बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले. दुपारी १२वाजेपर्यंत अपघातातील मृतदेह काढण्याचे काम सुरू होते.
मृतांमध्ये प्रतिभा मुकेश मरोही (३६) रा.सुरत, अमर अशोक बारी रा.पाचोरा, समशोद्दीन शेख युसूफ (४७) रा.भुसावळ, चालक वरदीचंद सोहनलाल मेघवाल (२४)रा.वेलदीया, जि.उदयपूर, सहचालक गणेश अंबादास नागरे (२३) रा.बुलढाणा यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये कन्हैयालाल बाबुलाल बागुल (३५)रा.केलपाडा, ता.साक्री, सैय्यद हारून सैय्यद समद (३४)रा.जळगाव, सैय्यद रियान सैय्यद हारून (१५)रा.जळगाव, आयुबखान साडेखान (५५) रा.जळगाव, समाधान सचीन पाटील (२८) रा.जळगाव, मुकेश रामचंद्र पाटील (३७)रा.सुरत, नासीरखान सुभानखान पठाण (२०) रा.सुरत, शांताराम किसन धनगर (३८)रा.भादली, ता.जळगाव, निलेश शांताराम धनगर (२२) रा.भादली, ता.जळगाव, फारूक शेख गनी (५२)रा.सुरत, सयैद जोया सैय्यद हारून (१८)रा.जळगाव, कुरसीनबी सानेखान (७०)रा.जळगाव, अपसाना सैय्यद (३२)रा.जळगाव, अख्तरबी अयुबखान (६०)जळगाव, रेखा समाधान पाटील (२६)रा.जळगाव, उषा शांताराम धनगर (४०)रा.भादली, ता.जळगाव, पुष्पाबाई विलास पाटील (५०)रा.सुरत, भाग्यश्री समाधान पाटील (२४)रा.जळगाव, प्रिया समाधान पाटील (नऊ वर्ष) रा.जळगाव, रोशनी अमर बारी (२४)रा.सुरत, जयेश भानुदास वाघोदे (२८)रा.जळगाव, उर्वशी विनोद पाटील (१०) सुरत, शोभा अनीलसिंग (४८)रा.सुरत, अनील सदानंदसिंग (५२)रा.सुरत, शेख नबीयाबी सालार (३५)रा.सुरत, शेख खलील शेख ईसा (५५)रा.सुरत, मोनिका पवन मारोटी (१७)रा.सुरत, श्रेयेश पवन पोगलीया (१३), मुकेश चंपकलाल जैन (४०)रा.सुरत, राजेश धरमदास मलानी (५०)रा.जळगाव, सिद्धार्थ संजय बिरारे (२०) रा.जळगाव, भलराम सिमनदास वलेचा (५२)रा.सुरत, विवेक राजेश मवानी (१९) रा.जळगाव, समाधान लालचंद पाटील (३७)रा.जळगाव.
 पोलीस सूत्रानुसार धुळे सुरत महामार्गावर रात्री जळगाव हुन सुरत कडे शुभम ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस (क्रमांक जी जे ०५ एव्ही ८५ ०१) ही भरधाव वेगाने धावतअसताना या बसच्या पुढे धावणारी किंग ट्रॅव्हलर कंपनीची खाजगी बस क्रमांक  (जि.जे १४ एक्स ३१११)  हिला कोंडाईबारी घाटातील खामचौंदर शिवारातील हजरत सय्यद अली रसूल बाबा यांच्या दर्ग्या जवळील पुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात उजव्या बाजूला जोरात धडक दिली. यावेळी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शुभम ट्रॅव्हल कंपनीची खाजगी बस अपघात करून व पुलाचे कठडे तोडून चाळीस फूट खाली उभी कोसळली.

  • या अपघातात समोर धावणाऱ्या खाजगी बसचा पत्रा कापला जाऊन त्यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले. तर पुलाखाली कोसळलेल्या बस मधील पाच प्रवासी जागीच ठार झाले तर इतर ३१ जण गंभीर जखमी झाले. एकुण ३५ जण जखमी झाले. 
  • हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त खासगी बसचे अक्षरशा वरचा भाग आणि खालचा भाग असे दोन तुकडे झाले या बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाश्यास अक्षरशः गॅस कटर च्या साह्याने पत्रा कापून त्याला बाहेर काढण्यात आले. हा प्रवासी सात तासापासून पाय अडकून पडलेल्या अवस्थेत होता. बाहेर काढल्या नंतर वैद्यकीय उपचारासाठी त्याला पाठवण्यात आले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदना सह प्राण वाचल्याचा समाधान दिसत होते.

Web Title: In Kondaibari, a private bus crashed into a ravine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.