लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील रेवानगर ते चौगाव खुर्द रस्त्यावर रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस जागीच ठार झाल्याची घटना घडली.तळोदा तालुक्यातील रेवानगर ते चौगाव खुर्द या रस्त्यावर एक तरस मृत अवस्थेत आढळून आला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता तो प्राणी तरस असून वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तळोदाचे सहायक वनसंरक्षक कापसे, वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार यांच्या मार्गदर्शनाखाली अमोनीचे वनरक्षक श्रावण कुवर, गिरधन पावरा, वनमजूर भीमसिंग कोठारी, जयसिंग वळवी , निलवर कोठारी आदींनी त्या प्राण्यावर अंत्यसंस्कार केले.
वाहनाच्या धडकेत तरस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:21 IST