शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

निरिक्षकांवर जागेवरच कारवाई करणार : खरीप नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:15 IST

पालकमंत्र्यांचा इशारा, पावणेतीन लाख हेक्टर लक्षांक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : ज्या भागात बोगस बियाण्यांची विक्री होईल, खतांचा काळाबाजार होईल त्या भागातील कृषी निरिक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईच्या सुचना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलतांना दिल्या. दरम्यान, खरीप उत्पादकता वाढविण्यासाठी शेतक:यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा दोन लाख 73 हजार 588 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे.खरीप हंगाम आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, आदिवासी प्रकल्प अधिकारी वनमती सी., विनय गौडा यांच्यासह कृषी, वीज, पणन, सहकार, रोहयो यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, पुढील महिन्यापासून बागायती कापूस लागवड होणार आहे. त्यानंतर कोरडवाहू लागवड होईल. त्यामुळे बी.टी.कापूस बियाण्यांना मागणी वाढेल. जिल्ह्यात दरवर्षी बोगस बी.टी.बियाण्यांबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी येतात. अशी बियाणे कुठून येतात, कोण विक्री करतो याकडे लक्ष देण्यात यावे. ज्या भागात अशी बियाणे विक्री होतील, शेतक:यांची फसवणूक होईल त्या भागातील कृषी निरिक्षकास  जबाबदार धरून कारवाई        करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे तालुकानिहाय खरीप आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. खरीप कर्जाची प्रकरणे तातडीने मंजुर करून 15 मे र्पयत पीक कर्जाचा सर्व पैसा शेतक:यांच्या हातात पडेल यादृष्टीने नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.खासदार डॉ.हिना गावीत यांनी केंद्राच्या विविध योजनेतून जिल्ह्यातील शेतक:यांना लाभ दिला गेला पाहिजे. शेतक:यांर्पयत त्या योजना पोहचल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोंड अळीच्या नुकसानग्रस्त शेतक:यांना किती अनुदान आले, किती वाटप झाले याची माहिती विचारली. याशिवाय बोंडअळीवर नियंत्रणासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, दुस:या पर्यायी वाणांबाबत जनजागृती करण्यात येत आहे काय? याबाबत विचारणा  केली.आमदार उदेसिंग पाडवी यांनी आदिवासी भागातील शेतक:यांना विशेषत: डोंगर उतारावरील शेती करणा:या शेतक:यांना स्थानिक ठिकाणी मार्गदर्शन करण्याबाबत सुचना केल्या.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, गेल्या काही वर्षात शेतक:यांना अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीवर नियोजनावर भर देण्यात आला आहे.सुरुवातीला प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे यांनी    खरीप हंगामाचा आढावा सादर   केला.