जवखेडा येथे एकाचा ठिबकच्या नळीने गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:30 AM2020-03-30T11:30:58+5:302020-03-30T11:31:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : जवखेडा शिवारात एकाने ठिबकच्या नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...

At Jawkheda, one slips through a drip tube | जवखेडा येथे एकाचा ठिबकच्या नळीने गळफास

जवखेडा येथे एकाचा ठिबकच्या नळीने गळफास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी : जवखेडा शिवारात एकाने ठिबकच्या नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दिलीप सुदाम मराठे (३०) रा.शिरुड-उमरठी ता.शहादा असे मयताचे नाव आहे. जवखेडा शिवारात सुशीलाबाई पुरुषोत्तम पाटील यांचे मालकीचे शेत आहे. या शेतात रखवालदार रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेताच्या बांधावरील झाडावर अनोळखी व्यक्ती ठिंबक च्या नळीच्या सहाय्याने गळफास लावलेला दिसून आला. त्यांनी पोलीस पाटील सुरेश अशोक पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात खबर दिली.
पोलीस सहाययक निरीक्षक निलेश वाघ, ब्राह्मणपुरी बिटचे हवालदार धिरसिंग वळवी, सुनील वाकडे, विश्वनाथ नाईक यांनी पंचनामा केला. शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: At Jawkheda, one slips through a drip tube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.