विसरवाडी परिसरात जनजीवन आले पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:51 PM2020-06-22T12:51:22+5:302020-06-22T12:51:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़ यामुळे विसरवाडी व परिसरातील व्यवहार सुरळीत ...

Janjivan came to the fore in Visarwadi area | विसरवाडी परिसरात जनजीवन आले पूर्वपदावर

विसरवाडी परिसरात जनजीवन आले पूर्वपदावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़ यामुळे विसरवाडी व परिसरातील व्यवहार सुरळीत होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे़
गडदाणी येथे मुंबई येथून आलेला पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती़ त्याच्या संपर्कात विसरवाडी, गडदाणी आणि माचाहोंडा येथील तब्बल ५८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ यातील ११ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते़ दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार यशस्वी होवून तो कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी पाठवण्यात आले आहे़
संबधित कोरोनाबाधित रुग्ण हा विसरवाडी आणि माचाहोंडा या दोन गावांमध्ये येऊन गेल्याने ही गावे काही काळासाठी लॉकडाऊन झाली होती़ नवापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या विसरवाडी येथे लॉकडाऊन उघडल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे़ भाजीपाला, किराणा, कापड दुकानांसह इतर व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत़ महामार्गावर असलेल्या विसरवाडी गावालगत छोटे-मोठे ढाबे आहेत़ लॉकडाऊनमुळे अडीच महिने बंद असलेले ढाबे पूर्ववत सुरु होत आहेत़ यातून महामार्गावर धावणारे ट्रकही थांबू लागले आहेत़ यातून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्यास मदत होत आहे़ विसरवाडी परिसरातील गावांमधील नागरिक शेतीसाहित्य, बियाणे आणि खते घेण्यासाठी येऊ लागले असल्याने तेथेही वर्दळ दिसून येत आहे़ दरम्यान गावात बाजारपेठ सुरळीत सुरु असली तरी ग्रामपंचायत सरपंच बकाराम गावीत यांच्यासह ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे व सदस्य हे वेळोवेळी गावात भेटी देऊन उपाययोजनांची पाहणी करत आहेत़ निर्जंतुकीकरण आणि फवारणीसह नागरिकांनी मास्कचा वापर करणे व सॅनेटायझर वापरावर लक्ष देण्याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे़
गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी गावात गेल्या दोन दिवसात भेटी देत गावातील परिस्थतीचा आढावा घेतला होता़


विसरवाडी गावासोबत नवापूर तालुक्यातील किमान ५० च्या जवळपास गावांचा दैनंदिन व्यवहार असतो़ रविवारी शेतकऱ्यांची शेती साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती़ परंतू व्यावसायिकांनी येथेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास प्राधान्य देत गर्दीला आवर घातला़

Web Title: Janjivan came to the fore in Visarwadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.