जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपतर्फे ३३० रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:48 PM2019-12-16T12:48:30+5:302019-12-16T12:48:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप, वेदिका वेलफेयर फाऊंडेशन व तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या ...

Jain Social Platinum Group examines 3 patients | जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपतर्फे ३३० रुग्णांची तपासणी

जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपतर्फे ३३० रुग्णांची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप, वेदिका वेलफेयर फाऊंडेशन व तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र व त्वचा रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप, वेदिका वेलफेयर फाऊंडेशन व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये नेत्र व त्वचा रोग तपासणी शिबीर रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घेण्यात आले. शिबिरात नेत्र व मोतीबिंदू तपासणीसह सोरायसिस, त्वचाविकार तसेच मुलांना ऐकू न येणे यावर निदान करण्यात आले. या वेळी नाशिक येथील नेत्रचिकित्सक डॉ.एस.वाय. पाटील, नीलेश शंभेकर, कुलदीप भोसले, पी.जी. सूर्यवंशी, सोरायसिस व त्वचा चिकित्सक डॉ.जयश्री पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात परिसरातील गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
याप्रसंगी वेदिका फाऊंडेशनचे प्रशासक विलास पाटील, वनिता पाटील, महेंद्र दुग्गड, जयेश बाफना, पीनल शाह, शैलेश जैन, देवेंद्र उपासणी आदी उपस्थित होते. शिबिरासाठी जयति बहुद्देशीय संस्था संचलित महेंद्र पब्लिक स्कूलचे सहकार्य लाभले.

Web Title: Jain Social Platinum Group examines 3 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.