शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

पदरमोड करून रेमडेसिविर गरीब रुग्णांना वाटप केले हा गुन्हा ठरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खान्देशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार: कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खान्देशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून कमी दरात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवले. मंत्री नवाब मलीक यांना हा गुन्हा वाटत असेल तर आम्ही गुन्हा केला फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच आणि पुन्हा तो करणार असे प्रतिउत्तर हिरा प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी आमदार शिरिष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

मंत्री नवाब मलिक यांनी नंदुरबार हिरा ग्रुप मार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून हॉटेल हिरा पॅलेस मध्ये इंजेक्शनचा मोठा साठा असल्याचा आरोप मंगळवारी केला. या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरिष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे राज्यात, जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधांचा अभावाने परिस्थिती बिकट झाली आहे. केवळ नंदुरबारच नाही तर खान्देशा अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे. काही घरातील कर्ते पुरुष गेले आहे आणि काही जात आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

परदेशात निर्यात होणारे रेमडेसिविर इंजेक्शन आपल्या भागातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सेवा म्हणून उपलब्ध करून दिले. हे इंजेक्शन स्वतः तोटा सहन करत साडे आठशे, नऊशे, पंधराशे रुपये अश्या भावाने दिले. बाजारभावात त्याचे मूल्य अधिक असताना हिरा ग्रुपने स्वतःचे पंचवीस ते तीस लाखांचा खर्च करून पदरमोड केले. त्यामुळे काळा बाजारचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याला जनता, प्रशासन साक्षीला आहे.त्यामुळे आम्ही शासनाचा कर बुडवला नाही किंवा फसवणूक केली नाही. त्यामुळे मंत्र्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर रूग्णांची सेवा करण्याची आहे.

अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी खोटी माहिती पुरवण्याचा आरोप करीत मंत्री नवाब मलीक यांनी त्याची शहनिशा न करता आरोप केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पालिकेतील विरोधी गटनेते चारूदत्त कळवणकर उपस्थित होते.