लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : दोंदवाडे ता़ शहादा येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या शहादा कार्यालयाकडून तयार केलेल्या रोपवाटिकेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर तळोदा वनविभागाच्या अधिका:यांनी चौकशी केली़ अधिका:यांनी दोंदवाडे येथे जाऊन जाबजबाब घेतल्याची माहिती आह़े दोंदवाडे येथे ग्रामपंचायतीने सामाजिक वनीकरण विभागासोबत करार करुन गट क्रमांक 92 मध्ये रोपवाटिका तयार केली होती़ परंतू प्रत्यक्षात ही रोपवाटिका दुस:याच ठिकाणी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़ रोपवाटिका करार करणारे ज्ञानेश्वर हिम्मत पाटील यांनी बनावट सातबारा जोडून गट क्रमांक 92 हा दुस:यांच्या नावे असताना स्वत:च्या नावे दाखवत बनावट नोंदी करुन सामाजिक वनीकरण विभागाची फसवणूक केली विभागाकडून प्रती महिना 9 हजार रुपयांचे भाडे वसुल केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार तळोदा मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक ए़टी़थोरात यांनी दोंदवाडे येथे जाऊन चौकशी केली़ रोपवाटिकेचा करार करणारे ज्ञानेश्वर हिंमत पाटील यांनी प्रत्यक्षात रोवाटिकेसाठी दाखवलेली जागा आणि प्रत्यक्षातील लागवड क्षेत्र यात 5 किलोमीटरचे अंतर असल्याने यात शासनाची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सामाजिक वनीकरणकडे केल्या गेल्या होत्या़ करारनाम्यात प्लॉट बिनशेती असल्याचा तसेच साधारण 7 हजार स्क्वेअर फूट जागेत 2 लाख 8 हार रोपे लागवड केल्याची तक्रार करण्यात आल्याने समितीने याठिकाणी जाऊन माहिती घेतली आह़े यावेळी चौकशी अधिका:यांसोबत मंगेश गिरासे, दिलीपसिंग गिरासे, सचिन पाटील, सोमा भिल, दिलीप भिल, माधवराव भिल, राजेंद्र भिल, शहाणा गवळे, विक्रम ठाकरे, भगवान भिल, महेंद्र गिरासे, विरेंद्र गिरासे, सुरेंद्र गिरासे, अमृत गवळे, संजय पाटील, तलाठी विशाल पाटील, पोलीस पाटील आनंदसिंग गिरासे पोलीस पाटील नागरिक व तक्रारदार उपस्थित होते.
दोंदवाडे येथे सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेत गैरव्यवहार झाल्याने चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:21 IST