२८ पथके व ८४ अधिकाऱ्यांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:37 PM2020-05-30T12:37:04+5:302020-05-30T12:37:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा सुरळीतपणे मिळत ...

Investigation by 28 squads and 84 officers | २८ पथके व ८४ अधिकाऱ्यांकडून तपासणी

२८ पथके व ८४ अधिकाऱ्यांकडून तपासणी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा सुरळीतपणे मिळत आहेत किंवा नाही? हे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाभरात अचानक २८ भरारी पथके पाठवून एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायती आणि रोजगार हमी योजनेच्या कामाची पहाणी केली.
जिल्ह्यात नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखाने यातील कामकाज कोरोना विषाणूच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांनुसार सुरू आहे किंवा नाही? हे पाहण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या व उपस्थिती, आरोग्य केंद्रांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, तेथील उपकरणे, केंद्रांच्या प्रशासकीय दप्तराची परिस्थिती त्याचबरोबर औषधांचा उपलब्ध साठा, याबाबत माहिती घेण्यात येत असून, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मासिक सभा नियमानुसार नियमित होतात काय?, ग्रामसभा नियमांनुसार पार पडत आहेत काय?, ग्रामपंचायतीने विविध नोंदवह्या अद्ययावत ठेवल्या आहेत काय?, ग्रामपंचायतींची कर वसुली योग्यरीत्या केली जात आहे का?, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांची कामे योग्यरीत्या केली जात आहेत काय?, अशा पद्धतीची पाहणी या भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली २८ पथकांची एकूण ८४ अधिकाºयांचा समावेशाने नियुक्ती केली होती. त्यात स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा घोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, डॉ. वर्षा फडोळ यांच्यासह २८ पथकांतील ८४ अधिकाºयांनी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व भागात गेलेल्या पथकांकडून जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल दिला जाणार आहे.


यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊन, सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केली पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सुद्धा उपस्थित कर्मचारी वर्ग, त्यातील तांत्रिक कामाचा आढावा, साथीच्या रोगाबाबत दवाखान्यात ठेवण्यात आलेल्या नोंदवह्या, तसेच ग्रामस्थांसाठी दवाखान्याची माहिती भिंतीवर लावण्यात आली आहे काय? या बाबींचा भेटीतील पाहणी मुद्द्यांमध्ये समावेश आहे. रोहयो कामावरही या पथकांकडून भेटी देण्यात आल्या असून, कामावरील मजूर उपस्थिती तपशील, सोयी सुविधांचा तपशील कामांबाबत तपशील, मजुरी वाटप आदी बाबींची माहिती घेण्यात आली.


 

Web Title: Investigation by 28 squads and 84 officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.