शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संगीत प्रेमाने बनवले ‘दिल है हिंदुस्थानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:50 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दूरदर्शनच्या रियॉलिटी शो ‘दिल है हिंदुस्थानी’च्या अंतिम फेरीर्पयत येण्यासाठी रसिकांनी भरभरुन ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दूरदर्शनच्या रियॉलिटी शो ‘दिल है हिंदुस्थानी’च्या अंतिम फेरीर्पयत येण्यासाठी रसिकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यांचे मी ऋणी आहेच पण ख:या अर्थाने भारतीय संगीताने व संस्कृतीने माङो तनमन जिंकले असून त्यामुळेच मी ख:या अर्थाने ‘दिल है हिंदुस्थानी’ झाल्याची प्रतिक्रिया रशियन ध्येयवेडी संगीतसाधक नास्त्या सरस्वती हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.भारतात सध्या पाश्चातीकरणाचे अनुकरण करण्यास स्पर्धा लागली आहे. अनेकांना पाश्चात्य संस्कृतीने अक्षरश: वेड लावले आहे. परंतु विदेशी नागरिकांनाही भारतीय संस्कृतीचे प्रचंड आकर्षण आहे. अनेक जण या संस्कृतीच्या मोहातच हरवून भारतीय होतात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यातीलच एक म्हणजे नास्त्या सरस्वती. रशियातील सेंट पीटरबर्गमध्ये राहणारी ही तरुणी 2010 मध्ये पर्यटनासाठी भारतात आली आणि भारतीय संगीताची तिला असे वेड लागले की आज ती भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे एकरुप झाली आहे. नव्हे तर लवकरच ती नंदुरबार येथील सून होणार आहे. नुकतीच ती नंदुरबार येथे आली होती. या पाश्र्वभूमीवर तिची भेट घेतली असता तिचा ध्येयवेडा प्रवास अक्षरश: थक्क करणारा आहे.नास्त्या सरस्वती हिने पाश्चात्य संगीताचे शिक्षण रशियात घेतले. परंतु या संगीतात तिचे मन रमले नाही. रशियामध्येच भारतीय संगीताबाबत तिला काहीसे आकर्षण होते. पुढे पर्यटनानिमित्त ती भारतात येऊ लागली आणि त्यातूनच तिचा भारतीय संगीताचा अभ्यास सुरू झाला. संगीताच्या अभ्यासासाठी तिने भारतातीलच एल.सुब्रमण्यम, एन.राजम, एस.अक्काराई, कला रामनाथ, इंद्रदीप घोष, एल.शंकर, महुआ मुखर्जी आदी प्रसिद्ध संगीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. व्हायोलीन आणि बासरी वाजवण्याचे तिने शिक्षण घेतले असून ते अतिशय उत्तमपणे वाजवते. याशिवाय सारंगी, पियानो, हार्मोनियमही ती वाजवते. सध्या यासंदर्भात अनेकांना ती मार्गदर्शनही करते. अनेक शास्त्रीय संगीतकारांसोबत ती संगीताचे कार्यक्रमही सादर करते. खास करून पूर्वयान चटर्जी, रोहन दास गुप्ता, ध्रुव बेदी, नजीर अजीज, अलोकेश चंद्रा, केजी वेस्टमन, मनोसे नेवा, महुआ मुखर्जी, मुस्तबा हुसेन आदी अनेकांसोबत ती शास्त्रीय आणि फ्युजन संगीताचा कार्यक्रम सादर करते.नास्त्या सरस्वती ही ख:या अर्थाने भारतात प्रकाशझोतात आली ती दूरदर्शनच्या ‘दिल है हिंदुस्थानी’ या कार्यक्रमाद्वारे. यासंदर्भात तिने सांगितले, या कार्यक्रमाची मास्कोमध्ये  ऑडिशन होते. सहज आपण        मित्रांसोबबत या ऑडिशनला गेलो. हजारो कलाकार त्यासाठी ऑडिशनला आले होते. त्यामुळे आपण तेव्हा ऑडिशनला न जाण्याचा विचार केला. पण मित्रांनी आग्रह केला त्यामुळे ऑडिशन दिली. त्यात पुढील राऊंडसाठी निवड झाली. त्यानंतर मुंबईत ऑडिशन दिले, त्यातही निवड झाली. पुन्हा त्याचे टप्पे पार करत गेले. पहिल्या शंभरमध्ये, सोळामध्ये आणि अंतिम फेरीर्पयत आपली निवड होत गेली. रसिकांनी आपल्याला खूप प्रेम दिले म्हणूनच त्यातून आपल्याला अंतिम फेरी गाठता आली. पण ‘दिल है हिंदुस्थानी’ हे मात्र आपले उद्दिष्ट नव्हते. सहज मिळालेली संधी म्हणून आपण त्याकडे पाहिले. आजही त्याचे आपल्याला फारसे क्रेझ नाही. पण भारतीय संगीताचे मात्र प्रचंड आकर्षण आहे. त्याचा खूप अभ्यास आपण करीत आहोत. पुढे काय होईल ते माहीत नाही पण या अभ्यासातच आता आयुष्य घालवायचे आहे.आपण पाश्चात्य संगीत शिकले, कर्नाटकी शिकले पण भारतीय शास्त्रीय संगीतात जी मजा आहे ती कुठेच नाही. पाश्चात्य संगीत खरे तर बेचव वाटते पण भारतीय संगीत हे आयुष्याला ख:या अर्थाने सुगंधीत करणारे रसायन आहे. त्यामुळे आपल्याला या संगीताने मोहीत केले आहे. संगीताबरोबरच भारतीय संस्कृतीनेही आकर्षिक केले आहे. पर्यटनाच्यानिमित्ताने भारतात आपण गेल्या आठ वर्षात खूप वेळा आलो, 70 टक्के भारत पालथा घातला. काश्मिरपासून तर कन्याकुमारीर्पयत, हिमालयापासून तर आसाम, ओरिसा, पाँडेचरी, राजस्थान सर्वच ठिकाणी आपण जाऊन आले. येथील विभिन्नता, बोलीभाषा, खाद्य संस्कृती, लोकजीवन, वेशभूषा सर्वच पाहून आपण प्रभावीत झाले आहे. त्यामुळे ख:या अर्थाने ‘दिल है हिंदुस्थानी’ झाले आहे.नास्त्याच्या नावापुढे सरस्वती हे भारतीय नाव आल्यामुळे ते सर्वानाच आकर्षित करते. त्याबाबत विचारले असता नास्त्याने सांगितले, रशियात नावापुढे अशा उपाधी लावण्याची प्रथा आहे. माङया मित्रांनी व नातलगांनी माङया नावापुढे सरस्वती हे नाव लावले. भारतात आल्यानंतर लक्षात आले की, सरस्वती ह्या भारतातील देवता आहेत. त्यामुळे हे नाव माङया नावापुढे असल्याने मी त्यावेळी विचलीत झाले. एखाद्या देवतेचे महान नाव आपल्या नावापुढे कसे लावावे पण त्यानंतर मित्रांनी माझी समजूत घातली की भारतात अनेक महिलांची नावे सरस्वती आहेत. त्यामुळे मला बरे वाटले आणि अभिमानही वाटला. भारतीय देवदेवतांबद्दल माझी श्रद्धा आहेच. विशेषता: श्रीकृष्णाबद्दल माझी जास्त श्रद्धा आहे. भारतात अनेकवेळा दिल्ली ते मुंबई प्रवास करताना मथुरा स्टेशन पाहिले पण मथुरा व वृंदावनला मी जाऊ शकले नाही त्याची मात्र मला खंत आहे. पुढच्यावेळेस निश्चितच तेथे जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेईल.