शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लॉकडाऊनमध्ये भाजीपाला लागवडीचा वाढला टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 9:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिन्यात बाजारपेठेची वाताहत झाली आहे़ अनेक व्यवसाय रसातळाला गेल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिन्यात बाजारपेठेची वाताहत झाली आहे़ अनेक व्यवसाय रसातळाला गेल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत़ मात्र शेतशिवारात याउलट स्थिती असून कोरोनामुळे भाजीपाला मागणी वाढल्याने जिल्ह्यात भाजीपाला लागवडही वाढली आहे़ गेल्या वर्षात ९ हजार हेक्टरपर्यंत होणारा भाजीपाला यंदा थेट ११ हजार हेक्टरवर गेल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला आधार देणार अशी शक्यता आहे़हंगामी भाजीपाला लागवडीवर भर दिल्या जाणाºया नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने भेंडी, वांगी, कोबी, फ्लावर, कांदा आणि मिरची या भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते़ तीन ते सहा महिन्याच्या उत्पादनाला लागणारे पाणी आणि खर्च यामुळे मर्यादित शेतकरी भाजीपाला लागवड करतात़ यंदा कोरोनामुळे मार्च ते जून या काळात सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याला मोठी मागणी मिळत होती़ यातून बºयाच शेतकऱ्यांनी या काळात भाजीपाला लागवड करुन घेत संधी सोने करण्याचा प्रयत्न केला आहे़ यातही भाजीपाला खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचे दावे सुरू झाल्याने बाजारातून सर्वच भाजीपाल्याला उठाव मिळाल्याने शेतकºयांचा उत्साह दुणावून लागवडीचे क्षेत्र वाढले आहे़जिल्ह्यात आजअखेरीस ११ हजार ६६३ हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे़ यात २८९ हेक्टर टोमॅटोे, २८० हेक्टर वांगी, ३१६ हेक्टर भेंडी, २२० हेक्टर कोबी तर सात हजार ७१ हेक्टर क्षेत्रात विविध पालेभाज्या तसेच फळवर्गीय भाज्यांचा समावेश आहे़ यापूर्वी जिल्ह्यात उन्हाळी व पावसाळी भाजीपाला लागवड ही किमान ९ हजार हेक्टरच्या पुढे जात नव्हती़ तालुकानिहाय भाजीपाला पिकांचा आढावा घेतल्यास शहादा तालुक्यात ७ हजार ८०५ हेक्टरवर विविध फळ आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे़ त्याखालोखाल नंदुरबार ३ हजार ४२१, नवापूर १३८, तळोदा ११८, धडगाव ३४ तर अक्कलकुवा तालुक्यात १४७ हेक्टरवर भाजीपाला लागवड झाली आहे़ एकीकडे भाजीपाला लागवड वाढत असताना कांदा लागवडीचे क्षेत्र मात्र मर्यादित असल्याचे चित्र आहे़ आतापर्यंत १२२ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ लागवड झालेला बहुतांश भाजीपाल्याचे उत्पादन ३० ते ४५ दिवसात येण्यास सुरूवात होणार आहे़