शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत शिक्षक व बाहेरगावच्या नागरीकांमुळे वाढल्या कोविड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:55 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळी काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असल्याने चिंताही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळी काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असल्याने चिंताही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड टेस्ट करणा-यांची संख्या वाढली आहे. यात प्रामुख्याने बाहेरगावाहून परलेल्या नागरीकांसह शाळेत सोमवारपासून हजर होणारे शिक्षकही आहेत. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने दिवाळीत मूूळगावी गेलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करुन घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३८ माध्यमिक शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करणा-या १ हजार ८९३ शिक्षक व शिक्षिका तसेच ६८५ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तपासण्या करण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. यातून १ हजार १११ शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण करुन अहवाल देण्यात आले आहेत. यातील केवळ २० जणांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समाेर आली आहे. पाचवी ते आठवीच्या आणि नववी ते बारावीच्या वर्गासाठी काम करणा-या शिक्षकांकडून स्वॅब देण्यासाठी सध्या धावपळ सुरू आहे. यातील बरेच जण हे दिवाळीत गावी गेले होते. तेथून ते परत येवून स्वॅब देत आहेत. दुसरीकडे शिक्षक व कर्मचाा-यांसोबतच बाहेरगावाहून पुन्हा घरी परतलेल्यांकडूनही स्वॅब देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस स्वॅब कलेक्टींग सेंटरवर गर्दी वाढत असल्याचे दिसून आले आहे. दिवाळीत पुणे मुंबईसह परराज्यातून परतलेले स्वेच्छेने स्वॅब देत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरटीपीसीआर लॅबमध्ये दिवसभरात १४० पेक्षा अधिक स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे. 

 नंदुरबार शहरात शाळा क्रमांक एक आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वॅब घेतले जातात. याठिकाणी गेल्या चार दिवसांपासून गर्दी आहे. बाहेरगावी गेलेले शिक्षक, त्यांचे कुटूंबिय यांच्यासोबत बाहेरगावाहून आलेले नागरीक स्वॅब देताना दिसून आले.  

  आरोग्य विभागाकडून कोविड टेस्टींग सेंटरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी शाळा निहाय चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. यातून गर्दी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पाच हजार शिक्षक असून यातील बहुतांश हे बाहेरगावचे रहिवासी आहेत. दिवाळीत ते गावी गेले होते.