२१ हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:53 AM2020-05-26T11:53:38+5:302020-05-26T11:53:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रजाळे येथील कुटूंबांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अहवालानंतर ...

Incoming of 21,000 citizens | २१ हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

२१ हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रजाळे येथील कुटूंबांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अहवालानंतर तालुका आरोग्य विभाग कामाला लागला असून तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या २१ हजार नागरिकांचा आढावा घेतला जात आहे़ यामुळे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकाची माहिती मिळून क्वारंटाईन करणे सोपे होणार आहे़
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर परराज्यात तसेच राज्याच्या मोठ्या शहरांमध्ये अडकून पडलेले मूळ रहिवासी, नोकरदार आणि स्थलांतरीत झालेले मजूर हे परत येत आहेत़ परतणाऱ्या या सर्वांची रस्त्यांवर किंवा त्यांच्या घरी जावून स्क्रिनिंग केली जात आहे़ याचरदम्यान रजाळे येथील कुटूंब धुळे मार्गाने नंदुरबार येथे आले होते़ यानंतर यातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार समोर आला़ या प्रकारानंतर तालुका आरोग्य विभाग पुन्हा सर्तक झाला असून तालुक्याच्या विविध भागात आलेल्या नागरिकांचा आढावा घेत त्यांच्यातील लक्षणांची माहिती आशा आणि आरोग्य सेविकांकडून मागवली जात आहे़
तालुका आरोग्य विभागाच्या या कामामुळे नंदुरबार तालुका नजीकच्या काळात कोरोनामुक्त होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
तूर्तास जिल्ह्यातील सर्वाधिक तीन मोठे क्वारंटाईन सेंटर हे नंदुरबार तालुक्यात असून त्याठिकाणी सध्या ४१ जण दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये दाखल केलेल्यांना सर्व प्रकारच्या सोयी देतानाच त्यांचे समुपदेशन करुन कोरोनाची भिती घालवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ तालुका आरोग्य विभागासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे गावोगावी नागरिकांसोबत संपर्कात असून बाहेरगावाहून आलेल्यांची तात्काळ चौकशी होत आहे़

नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत २१ हजार ३७५ नागरिक बाहेरगावाहून आले आहेत़ पुण्या-मुंबईसह राज्यातील इतर शहरे आणि गुजरात राज्यातून ते परत आले आहेत़ मार्चपासून येथे आलेल्या या सर्व नागरिकांचे स्क्रिनिंग यापूर्वीच झाले आहेत़ वेळोवेळी आकड्यात वाढ होत असून प्रत्येकाची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक घरी जावून प्रवासाची माहिती घेत आहे़
नंदुरबार शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत ५०, याच भागातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ३० तर शहरातील पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तब्बल १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ एकूण १८० बेडची व्यवस्था असल्याने याठिकाणी ३१ वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कक्षांमधून आतापर्यंत २१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या तिन्ही कक्षांमध्ये ४१ जण दाखल आहेत़
बाहेरगावाहून मोठ्या संख्येने येणाºया नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवणे शक्य नसल्याने त्यांच्या हातावर शिक्के मारुन घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे़

Web Title: Incoming of 21,000 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.