शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

घराला लागून जाताय जीवघेण्या वीजतारा : नंदुरबार शहराची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अनेक ठिकाणी घर, गॅलरी आदींना वीजतारा चाटून जात असल्याचे दिसून येत आह़े अगदी अलगत स्पर्श होईल अशा स्थितीत या वीजतारा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असत़े त्यामुळे या ठिकाणी महावितरण तसेच नगरपालिकेनेही लक्ष देण्याची आवश्यकता आह़ेअनेक ठिकाणी घराला लागूनच विद्युत पोल आहेत़ त्यामुळे साहजिकच वीजतारा या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील अनेक ठिकाणी घर, गॅलरी आदींना वीजतारा चाटून जात असल्याचे दिसून येत आह़े अगदी अलगत स्पर्श होईल अशा स्थितीत या वीजतारा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असत़े त्यामुळे या ठिकाणी महावितरण तसेच नगरपालिकेनेही लक्ष देण्याची आवश्यकता आह़ेअनेक ठिकाणी घराला लागूनच विद्युत पोल आहेत़ त्यामुळे साहजिकच वीजतारा या घराला लागूनच जात असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे यातून एखादी मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही़ अनेक ठिकाणी महावितरणच्या वीजतारा लोंबकळलेल्या स्थितीत आह़े त्यामुळे हवेचा वेग वाढला की, या तारा एकमेकांना लागून घर्षण निर्माण होत असत़े त्यामुळे साहजिकच यातून काही वेळा ठिनग्यादेखील पडत असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े दरम्यान, अनेकांच्या घराला लागूनच वीजतारा गेल्या असल्याने काही नागरिकांना या वीजतारांना प्लॅस्टीकच्या पाईपांचे आवरणदेखील  लावण्यात आले आह़े परंतु हा तात्पुरती उपाय असून महावितरणने याबाबत काही तरी कार्यवाही करुन ही समस्या दूर करावी अशी मागणी आता संबंधित नागरिकांकडून करण्यात येत आह़े याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीची हद्द अवैध पध्दतीने वाढवली आह़े तसेच घराचे बांधकामदेखील चुकीच्या पध्दतीने झाले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े त्यामुळे याबाबतीत नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े त्यामुळे महावितरण व नगरपालिका प्रशासनाने याबाबत काही तरी मध्यम मार्ग काढत वीजतारांबाबत उपाय योजना करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आह़े नागरिकांनीदेखील घराचे बांधकाम करता नियम पाळणे गरजेचे आह़े