शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात चार कोटींच्या कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा नगरपरिषदेतर्फे नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत चार कोटी २५ लाख रूपांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा नगरपरिषदेतर्फे नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत चार कोटी २५ लाख रूपांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले. या विकास कामांमुळे शहरात नागरिकांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
नगरोत्थान अभियानांतर्गत तळोदा शहरात विकास कामांना मंजुरी मिळाली होती. त्यात चिनोदा चौफुली ते बिरसा मुंडा चौक रस्ता व दुभाजकाचे दोन कोटी, देशपांडे फोटो स्टुडिओ ते बस स्टॅण्डपर्यंत रस्ता तयार करणे ७५ लाख, हातोडा नाका ते खर्डी नदी पुला पावेतो गटारी व रस्ते ६६ लाख व खिरणी हट्टी रस्ता व गटारी १२ लाख रूपये अश्या चार कोटी २५ लाख रूपयांच्या विविध विकास कामांचा समावेश होता. नगराध्यक्ष अजय परदेशी व शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरपालिका मुख्याधिकारी सपना वसावा, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी यासह नगरसेवक भास्कर मराठे, रामानंद ठाकरे, अमानुद्दीन शेख, नगरसेविका अंबिका शेंडे, अनुपकुमार उदासी, प्रदीप शेंडे, हेमलाल मगरे, जालींधर भोई, सुरेश पाडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व मास्क लावून उपस्थित होते.
तळोदा शहरातील बस स्टँड जवळील बिरसा मुंडा चौकात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी व अजय परदेशी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्रा.विलास डामरे, प्रफुल्ल बुद्धीसागर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, आनंद सोनार, आदींसह पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या नगरोत्थान निधींतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी न्यु हायस्कूल जवळ सुसज्ज असा हॉल साकारला जात आहे. यासाठी ८८ लाख रूपये निधी मंजूर झाला असून, काही महिन्यातच त्याचेदेखील लोकार्पण केले जाणार आहे. तसेच मीरा कॉलनी येथे लॉन बनविण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी आठ लाख रूपये, भगवान सीताराम नगर येथील आदिवासी सांस्कृतिक भवन वॉल कम्पाऊंड व गार्डन यासाठी ६६ लाख रूपये निधी मंजूर झाला असून, ही कामेदेखील प्रगतीपथावर आहे.
या शहराच्या विविध विकास कामांमुळे शहराची वाटचाल ही प्रगतीपथाकडे होताना दिसत असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहाद्याकडून तळोदा शहरात प्रवेश करताना नगर पालिकेच्या वतीने प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराला तळोदा तालुक्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या रंजनपुर (मोरवड), ता.तळोदा येथील संत श्री गुलाम महाराज असे नामकरण करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजप तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र चंद्रसेन पाडवी, प्रेम पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यश नागेश पाडवी, तळव्याचे माजी सरपंच नारायण ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश केदार, माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, शहादा तालुका भाजपाचे अध्यक्ष डॉ.किशोर चव्हाण, आमदार पाडवींचे स्वीय सहाय्यक प्रा.विलास डामरे, वीरसिंग पाडवी, पालिकेचे आरोग्य निरक्षक अश्विन परदेशी आदींसह पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका व आप धर्माचे अनुयायी उपस्थित होते.