लोणखेड्यात साखर शाळेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:15 PM2019-12-14T12:15:36+5:302019-12-14T12:15:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : साखर कारखाना गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर ऊसतोड कामगारांचे मुले शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी ...

Inauguration of sugar school at Lonkhed | लोणखेड्यात साखर शाळेचा शुभारंभ

लोणखेड्यात साखर शाळेचा शुभारंभ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : साखर कारखाना गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर ऊसतोड कामगारांचे मुले शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी १९७२ पासून स्व.पी.के.अण्णांनी साखर शाळा सुरू करण्याचा पायंडा सुरू केला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करीत यंदाच्या हंगामात लोणखेडा गटातील साखर शाळेचा प्रारंभ करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी केले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत लोणखेडा गटातील साखर शाळेचा शुभारंभ लोणखेडा येथील सातपुडा विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक पी. आर. पाटील होते . याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील, कामगार अधिकारी पुरूषोत्तम मधुकर पाटील, सुरक्षा अधिकारी भरतगीर गोसावी, मायाबाई गुरव उपस्थित होते. पाटील म्हणाले की, ऊसतोड कामगाराचा मुलगा शिकला पाहीजे गाळप हंगामात आई-वडील ऊसतोडीसाठी कारखाना कार्यक्षेत्रात किमान चार ते सहा महिने थांबतात. या दरम्यान कामगारांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाने साखर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या शाळांमधून त्यांना शिक्षणासह माध्यान्ह भोजन, शैक्षणिक साहीत्याचे वाटप केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढते व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. या वेळी पी.जी. पाटील मुख्याध्यापक यांनी ही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी केले.

Web Title: Inauguration of sugar school at Lonkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.