नवापूर आगारातर्फे सुरक्षा मोहिमचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:05+5:302021-01-21T04:29:05+5:30

नवापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवापूर आगारातर्फे दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रवारी २०२१ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ...

Inauguration of Security Campaign by Navapur Depot | नवापूर आगारातर्फे सुरक्षा मोहिमचे उद्‌घाटन

नवापूर आगारातर्फे सुरक्षा मोहिमचे उद्‌घाटन

Next

नवापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवापूर आगारातर्फे दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रवारी २०२१ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सुरक्षितता मोहिमेचे उद्‌घाटन मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक नि. ही. सूर्यवंशी, सेवानिवृत प्राचार्य गोपाल पवार, श्रीकांत पाठक, धुळे येथील विभागीय वाहतूक अधीक्षक पी. डी. देवरे, आगारप्रमुख राजेंद्र अहिरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अमोल खैरनार आदी उपस्थित होते.

यावेळी मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी वाहनांची नियमावली प्रोजेक्टरव्दारे वाहक व चालकांना दाखवली. ते म्हणाले की, नेहमी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच वाहन चालवताना असंख्य प्रवाशांचा जीव तुमचा हातात असतो. त्यामुळे ओव्हरटेक करताना इंडिकेटरचा वापर करुन व साईड ग्लासमध्ये पाहूनच केले पाहिजे. विषेशत: प्रवासी वाहनांना डाव्या बाजूने ओलांडण्याची सवय टाळा. तसेच लेन बदलताना इशारा देण्याचे कधीही विसरू नका. अपघातस्थळी नेहमी आपण मदत केली पाहिजे. यानंतर धुळे येथील विभागीय अधीक्षक पी. डी. देवरे, सेवानिवृत प्रा. गोपाळ पवार यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत पाठक यांनी नवापूर आगाराने यापूर्वी प्रवासी उत्पन्न सुरक्षितता मोहिमेत विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सन्मान केल्याचे सांगितले. तसेच कोविड-१९ दरम्यान प्रवासी वाहतूक करून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, हे अभिनंदनीय आहे. आगारप्रमुख राजेंद्र अहिरे, मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर आगार लेखाकार सुरेश चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी भाविन पाटील, एस. बी. अहिरे, एस. आर. गावित, राजू पारधी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Inauguration of Security Campaign by Navapur Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.