अवैध लाकडासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:35 PM2020-10-17T12:35:12+5:302020-10-17T12:36:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर : वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील वावडी (सावरट) येथे एका वाहनातून अवैध ...

Illegal timber worth Rs 13 lakh seized | अवैध लाकडासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध लाकडासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर : वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील वावडी (सावरट) येथे एका वाहनातून अवैध तोडीचे खैर व शिसम मिळून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर व शहादा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील वावडी (सावरट) येथे जाऊन गावात संशयितरित्या उभे असलेला ट्रक (क्रमांक एम.एच.१९ झेड- ३७५३) या वाहनाची तपासणी केली असता त्यात ताज्या तोडीचा साल काढलेला खैर व शिसम चौपाट भरलेले आढळून आले. वन विभागाच्या पथकास पाहून  घटनास्थळावरून वाहन चालक फरार  झाला. 
घटनास्थळावर प्राप्त लाकूड अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे समजल्यावर वाहनासह लाकूड जप्त करून शासकीय विक्री आगार  नवापूर येथे जमा करण्यात आले. याबाबत वनक्षेत्रपाल नवापूर यांनी प्रथम         रिपोर्ट दिल्याने गुन्हा नोंद  केला        आहे. ही कारवाई खांडबारा वनक्षेत्रपाल व तेथील कर्मचारी,  वनक्षेत्रपाल फिरते पथक शहादा व तेथील कर्मचारी, वनक्षेत्रपाल          नवापूर व कर्मचारी यांनी केली. जप्त लाकूड माल व वाहनाची अंदाजे किंमत १३ लाख रुपये आहे. वनसंरक्षक वनवृत्त धुळे, उपवनसंरक्षक नंदुरबार, विभागीय दक्षता अधिकारी धुळे व सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रशांत हुमने, वनपाल पवार, डी.के. जाधव, वनरक्षक संजय बडगुजर, प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, सतीश पदमोर, नितीन पाटील, लक्ष्मण पवार, किसन वसावे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Illegal timber worth Rs 13 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.