शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शहाणा येथे अवैध स्पिरीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 1:04 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील शहाणा येथील शेतात धाड टाकून पोलिसांनी स्पिरीटसह एकुण ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुक्यातील शहाणा येथील शेतात धाड टाकून पोलिसांनी स्पिरीटसह एकुण ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, मध्यप्रदेशातून आडमार्गाने दारू, स्पिरीट, गुटखा, गांजा यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होणा-या कारवाईत हे स्पष्ट होत आहे. तेनसिंग उर्फ तेरसिंग शंकर पावरा रा बोरपाणी ता.शिरपुर जि.धुळे असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, २६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहाणा गावातील जंगलात गोपाल बिरबल पावरा यांचे शेताच्या बाजुला निंबाच्या झाडाखाली  बेकायदेशीररित्या  साठवलेले स्पिरीट जप्त केले आहे. त्यात  २५ हजार रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा ड्रम त्यात१०० लिटर स्पिरीट , दहा हजार रुपये किंमतीचा एक सफेद साचा, प्लॉस्टीकची कॅन त्यात ४० लिटर स्पिरीट, २२ हजार ५०० रुपये किंमतीच्या तीन प्लास्टीकच्या गोण्या त्यात एक एक लिटरच्या स्पिरीटने भलरेल्या अश्या एकुण ९० पिशव्या असा एकुण  ५७हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहादा पोलिसात अमृत विनायक पाटील  यांच्या फिर्यादीवरून तेनसिंग उर्फ तेरसिंग शंकर पावरा रा बोरपाणी ता.शिरपुर जि.धुळे  यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ  दिपक परदेशी करत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, गुटखा, गांजा यांची तस्करी होत आहे. मध्यप्रदेशातून शहाणा, मंदाणा मार्गे शहादा व गुजरातमध्ये वाहतूक केली जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशाच्या सिमेवर विशेषत: ग्रामिण भागातील रस्त्यावर चेकनाके तयार करावे अशी मागणी होत आहे.