१३ लाखाचे अवैध स्पिरीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:10 PM2020-02-15T13:10:48+5:302020-02-15T13:11:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बनावट दारु निर्मितीसाठी धडगावकडे अवैध स्पिरीट घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांची दावळघाटात सापळा रचून तपासणी ...

Illegal Spirit of 1 Lakh seized | १३ लाखाचे अवैध स्पिरीट जप्त

१३ लाखाचे अवैध स्पिरीट जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बनावट दारु निर्मितीसाठी धडगावकडे अवैध स्पिरीट घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांची दावळघाटात सापळा रचून तपासणी केली. त्यात दोन्ही वाहनांसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय वाहतुक करणाºया तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरपूरहून धडगावकडे दोन वाहनांमध्ये स्पिरीट घेून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री १० वाजेपासून धडगाव तालुक्यातील दावळघाट जवळ रस्त्यावर सापळा रचून धडगावकडे प्रत्येक वाहनांची तपासणी केली. त्यात पहाटे ५ वाजेच्या सुमाराम दोन वाहने भरधाव वेगात येत असल्याचे दिसून आले. या वाहनांना पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु हुलकावणी देत वाहन हाकण्याचाच प्रयत्न केला. दरम्यान सिनेस्टाईल दोन्ही वाहने थांबवून वाहनातील दिलीप लक्ष्मण पावरा, सिताराम लालसिंग पावरा रा. चोंदीपाडा ता. शिरपूर, प्रकाश वनसिंग पावरा यांना ताब्यात घेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे यांची अधिक चौकशी करण्यात आली. त्यात तीन लाखाचे एक हजार ५०० लिटर स्पिरीट आढळून आले. त्यामुळे या तिघा संशयितांसह ११ लाख ५० हजाराची दोन बोलेरो वाहनेही ताब्यात घेण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, हे.कॉ. दीपक गोरे, विकास अजगे, प्रमोद सोनवणे, विजय ढिवरे यांनी केली.

Web Title: Illegal Spirit of 1 Lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.