शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

ग्रामविकासासाठी अवैध ठेकेदारी मोडीत काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैध ठेकेदारी पद्धतीमुळे ग्रामविकासाच्या कामांचा दर्जा खालावून ग्रामसेवक संवर्गाला कारवाईला सामोरे जावे लागत आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवैध ठेकेदारी पद्धतीमुळे ग्रामविकासाच्या कामांचा दर्जा खालावून ग्रामसेवक संवर्गाला कारवाईला सामोरे जावे लागत आह़े यावर मार्ग ग्रामसेवकांनी विविध ठराव करत ग्रामीण भागातील कामांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत़ राज्य ग्रामसेवक युनियनच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आल़े अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी होत़े शहरातील देवमोगरा माता मंदिरावर सोमवारी दुपारी 2 वाजता ही बैठक घेण्यात आली़ यावेळी जिल्ह्यातील 535 ग्रामपंचायतींसाठी विविध विकास कामे, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास निधी, जनसुविधा, नागरी सुविधा, नक्षल क्षेत्र विकास निधी व इतर विकास निधींतून मंजूर असलेली कामे राजकीय वजन वापरुन काही स्वयंघोषित ठेकेदार घेत आहेत़ त्यांच्याकडून करण्यात येणारी कामे निकृष्ट दर्जाची कामे करुन निधी लाटत असल्याने कामांना खोडा बसत असल्याने ग्रामसेवकांवर कारवाई होत असल्याच्या मुद्दय़ावर बैठकीत चिंतन करण्यात आल़े  बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांनुसार यानुसार येत्या काळात कामकाज होणार असल्याची माहिती डीएनई 136चे जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी यांनी दिली़ 

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गावातील कोणत्याही व्यक्तीला काम मंजूरीचे ठराव दिले जाणार नाहीत तर ते नियमानुसार प्रस्तावासह पंचायत समितीला सादर केले जातील़ अनधिकृत आलेले काम मंजूरी पत्र, कार्यारंभ आदेश, मोजमाप पुस्तिका, अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयामार्फत डाक अथवा प्रत्यक्ष स्विकारले जातील़ 3 लाखावरची कामे ई-टेंडरने केली जातील़ अनधिकृत बाहेर तयार केलेले अंदाजपत्रक न स्विकारता अधिकृत अभियंता यांच्याकडून तयार केलेले तांत्रिक मंजूरी अंदाजपत्रक स्विकारले जाईल़ जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनी अनधिकृत ठेकेदारांना दस्तावेज हाताळू न देण्याचे निश्चित करण्यात याव़े