शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

करतो.. बघतो.. यातच दिवस संपतो, उपचार मात्र थांबतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या येथील कोविड केअर सेंटरचे भयाण वास्तव समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या येथील कोविड केअर सेंटरचे भयाण वास्तव समोर आले आहे. येथे रुग्णांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत नाही. जे पॉझिटीव्ह रूग्ण आहेत त्यांना सकस आहार नाही. दोन दोन दिवस रूग्णांच्या खोलीत वीज नाही. शौचालय व बाथरूमची साफसफाई होत नाही. त्यामुळे या सेंटरला जायला सगळे घाबरतात. एखद्या रुग्णाने जर तक्रार केली तर कर्मचारी म्हणतात बघतो... करतो... असेच उत्तर मिळते. वरिष्ठांची याठिकाणी नियमित भेट नसल्याने तक्रार करावी तर कोणाकडे? अशी व्यथा येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी मांडली.कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासोबतच या बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकृत करण्यासाठी प्रशासनाने मोहिदा येथील शासकीय वसतिगृहाच्या चार इमारतीत कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. मात्र या सेंटरमधील समस्या व दूरवस्था हे वादाचे मुद्दे ठरले आहेत. याठिकाणी शंभरपेक्षा अधिक नागरिकांना विलगीकृत करण्यात आले असून बाधितांवर उपचार सुरू आहेत. नियमानुसार येथे उपचार घेणाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यासह त्यांना योग्य तो औषधोचार देण्यासह सकस आहार देणे बंधनकारक असताना येथील जेवणाबाबत सर्वाधिक तक्रारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहेत.प्रशासनाने भोजन व्यवस्थेसाठी खाजगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. प्रती रुग्ण प्रती दिवस १२० रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. यात सकाळी चहा व नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा व रात्रीचे जेवण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून नियमानुसार भोजन पुरवठा केला जात नाही. सकाळच्या चहाबद्दल न बोललेलेच बरे. दररोज नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा असा पुरवठा केला जात आहे. चपात्या करपलेल्या असतात तर भाज्यांबद्दल काय बोलावे. वरण-भात काही प्रमाणात ठीक असतो. रुग्णाला सकस आहार आवश्यक असताना त्याचा पुरवठा केला जात नाही. परिणामी अनेक रुग्ण हे उपचाराच्या कालावधीत आपल्या घरच्या डब्यावरच अवलंबून असतात, अशी येथील स्थिती आहे.येथे उपचार घेणाºया रूग्णांची परिस्थिती अवघड आहे. केवळ दिवसभरातून एकदा तापमानाची मोजणी केली जाते. याव्यतिरिक्त नियमित कुठले औषध, गोळ्या नाही. ज्या औषधी दिल्या गेल्या आहेत त्यांची मुदत पुढील महिन्यात सप्टेंबर २०२० ला संपणारी आहे. त्याचप्रमाणे गोळ्यांच्या पाकीटांना झुरळ किंवा उंदराने कुरतडल्यासारखी परिस्थिती पाकिटावर दिसते. दिवसभरात कुठली औषधी मिळणार नसेल तर येथे थांबून काय फायदा? त्यापेक्षा घरी राहून उपचार केलेले बरे अशा द्विधा मनस्थितीत येथील रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून या कोविड केंद्रात रूग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.४एकीकडे शासन म्हणते की बाधित रुग्णांनी दिवसभर गरम पाणी प्राशन करावे, मात्र तेही येथे उपलब्ध करून दिले जात नाही. त्याचप्रमाणे गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दररोज आंघोळीसाठी गरम पाणी आवश्यक असते. मात्र येथे एका इमारतीत वीजपुरवठा नाही तर जेथे गिझर बसविले आहे तेथे गरम पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात.४पिण्यासाठी गरम पाणी मागितले तर गिझरचे पाणी प्या, असा अजब सल्ला या कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना दिला जातो. यापूर्वी या केंद्रात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी व सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांनी या केंद्रातील दूरवस्था प्रशासनाने सोडवावी. बाधितांना योग्य त्या सुविधा द्याव्यात, नियमानुसार भोजन द्यावे, वरिष्ठांनी दिवसातून किमान एकदा अचानकपणे या केंद्राची पाहणी करून व्यवस्था तपासावी, अशी मागणी केली आहे.भोजन ठेकेदाराला नियमानुसार भोजन देण्याची अट बंधनकारक आहे. दररोज नाश्त्यामध्ये शाकाहारी रुग्णाला फळे तर मांसाहारी रुग्णाला बॉईल अंडी देणे गरजेचे आहे, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आहार हा सकस असावा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. अन्न व प्रशासन विभागाला भोजनाचा दर्जा तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.-डॉ.मिलिंद कुलकर्णी,तहसीलदार, शहादा.