लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील घाटलीचा आग्रीपाडा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात मुसळ घालत खून केला़ सोमवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली़ बुदाबाई दिलीप वळवी (27) रा़ घाटलीचा आग्रीपाडा यांच्यावर पती दिलीप वळवी हा वेळोवेळी संशय घेत मारहाण करत होता़ दरम्यान सोमवारी दिलीप वळवी याने बुदाबाईसोबत वाद घालून मारहाणीस सुरुवात केली़ दरम्यान त्याने घरातील मुसळ बुदाबाई हिच्या डोक्यात घातली़ गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला़ याबाबत सायसिंग सत्या वसावे रा़ निंबडी ता़ शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महिलेचा पती दिलीप शिवण्या वळवी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आह़े घटनेनंतर दिलीप याला धडगाव पोलीसांनी अटक केली़ त्याला न्यायालयात हजर केले असता, 7 जूनर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक एस़व्ही़दहिफळे करत आहेत़
पत्नीच्या डोक्यात मुसळ घालून पतीने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:45 IST