शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

विश्व हिंदू परिषदेतर्फे शहाद्यात हुंकार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:53 IST

हजारोंची उपस्थिती : राममंदिर निर्माणासाठी पाठींबा; वाहतुकीची कोंडी

शहादा : रामजन्मभूमीवर राम मंदिर निर्माणासाठी पाठिंबा दर्शविण्यासाठी  शहादा शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भव्यहुंकार शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहीद लालदास चौकातील राम मंदिरापासून  करण्यात आली. प्रारंभी राम मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम धनकानी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.शोभायात्रा राम मंदिरापासून काढण्यात आली. शोभा यात्रेची सुरुवात दुपारी सव्वाचार वाजता झाली.  शोभायात्रेत जिल्हाध्यक्ष जत्रा पावरा, जिल्हामंत्री विजय सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा, केवलसिंग राजपूत राजा साली, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संजय साठे, संदीप पाटील, केशव महाराज पाठक, प्रशांत पाटीलसह हजारो रामभक्त सहभागी झाले होते. या वेळी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर हुबेहूब रामायणाचा देखावा सादर केला होता. शिवाय अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. या वेळी शहर पूर्णत: भगवामय झाले होते. याप्रसंगी रामभक्त श्रीरामांचा जयघोष करीत होते. मंदिर वही बनायेंगे जय श्रीरामचा नारा देत होते. या रॅलीमुळे रामभक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. ही शोभायात्रा शहीद लालदास चौक, सराफ गल्ली, तूप बाजार, मेन रोड, जामा मशिदी चौक, महात्मा गांधी पुतळा, तहसील कचेरी, दोंडाईचा रस्ता, महात्मा फुले चौकात आणण्यात आली. यानंतर शोभायात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सभेचे व्यासपीठ महाराणा प्रताप चौकाला लागून करण्यात आले होतेहुंकार सभा व शोभायात्रेसाठी जिल्हाभरातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. सर्वात जास्त पोलीस बंदोबस्त जामा मशीद चौकात लावण्यात आला होता. जामा मशीद चौकात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक पंडित सपकाळे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्लासह शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. या व्यतिरिक्त जनता चौक, बागवान गल्ली, क्रांती चौक भागातही बंदोबस्त लावण्यात आला होता. धडगाव, तळोदा, नंदुरबार, सारंगखेडा, म्हसावद येथून पोलीस बंदोबस्त मागवला होता. यात सहा पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. राज्य राखीव दलाच्या पोलीस जवानांची एक तुकडी तैनात केली होती. ठिकठिकाणी एक मार्गी वाहतूक करून पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते. शोभायात्रेत चार ते पाच हजार रामभक्त सहभागी झाले होते. शोभायात्रेत राम भक्तांमध्ये कमालीचा उत्साह होता. याप्रसंगी जिल्हाभरातून रामभक्त आले होते.