लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारने देऊ केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील 85 टक्के शेतकरी पात्र ठरले आहेत़ क्षेत्र मर्यादेची अट शिथील झाल्यानंतर नव्याने झालेल्या सव्रेक्षणात 1 लाख 29 हजार शेतकरी कुटूंबांचा समावेश करण्यात आला आह़े त्यांच्या याद्या अपलोड करणेही सुरु झाल्याने महिनाभरानंतर त्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयांचा ‘वार्षिक सन्मान’ जमा होणार आह़े केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेतील दोन हेक्टरची अट रद्द करुन बागायतदारांसह इतर शेतक:यांना दिलासा दिला होता़ यानंतर शेतकरी कुटूंब सव्रेक्षणाचे काम नंदुरबार जिल्ह्यात सुरु करण्यात आले होत़े बुधवारी दुपारी हे सव्रेक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर शेतक:यांची निश्चित संख्या समोर आली आह़े जिल्ह्यातील जवळजवळ 85 टक्के शेतकरी यात समाविष्ट झाले असून आयकर रिटर्न भरणारे आणि नोकरीस असलेल्या शेतकरी कुटूूंबांचा समावेश वगळता सरसकट सर्व शेतकरी पात्र ठरले आहेत़ नियुक्त केलेल्या ग्रामस्तरीय समित्यांकडून करण्यात आलेल्या सव्रेक्षणाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्यानंतर जिल्हा सूचना आणि विज्ञान केंद्रातून शासनाकडे नावे पाठवण्यास सुरुवात झाली आह़े येत्या 15 दिवसात पात्र शेतक:यांची माहिती अपलोड केल्यानंतर केंद्रीय स्तरावरुन खातेनिहाय रक्कम जमा होणार असल्याची माहिती आह़े नाव, बॅक खात्याची माहिती, शेतीक्षेत्र किंवा अन्य बाबीत त्रुटी आढळल्यास पुन्हा नव्याने माहिती देण्यात येणार आह़े एकीकडे नव्याने शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण पूर्ण झाले असताना फेब्रुवारी अखेरीस निश्चित करण्यात आलेल्या 74 हजार 561 पैकी निम्म्या शेतक:यांच्या खात्यावर पैसे आले नसल्याची माहिती आह़े याबाबत तालुकास्तरावर चौकशी केली असता, केंद्रीय सव्र्हरला अडचणी असल्याने नेमके किती शेतक:यांना रक्कम मिळाली याची माहिती मिळालेली नाही़ जिल्ह्यातील शेतक:यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही 30 हजार शेतकरी रकमेच्या प्रतिक्षेत आहेत़ जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात पात्र शेतक:यांच्या खात्यावरही केवळ ुदोन हजाराचा पहिला हप्ता देण्यात आला होता़ यानंतर मात्र पैसे मिळालेले नाहीत़
नव्याने केलेल्या सव्रेक्षणाअंती नंदुरबार तालुक्यात 26 हजार 592, नवापुर 27 हजार 16, शहादा 36 हजार 874, धडगाव 9 हजार 112, तळोदा 11 हजार 756 तर अक्कलकुवा तालुक्यात 18 हजार 115 शेतकरी कुटूंबे नव्याने केलेल्या सव्रेक्षणात समोर आली आहेत़ एकूण 1 लाख 29 हजार 465 शेतकरी कुटूंबांचे विविध कागदपत्रे समित्यांनी गोळा करुन नोंदण्या पूर्ण केल्या होत्या़ फेब्रुवारी अखेर आणि अट शिथिल झाल्यानंत नव्याने झालेले सव्रेक्षण असे मिळून जिल्ह्यातील 2 लाख 38 हजार 804 शेतकरी कुटूंब प्रधानमंत्री किसान सन्मानसाठी पात्र झाल्याचे सव्रेक्षणातून स्पष्ट झाले आह़े
दुस:या टप्प्यात सव्रेक्षण पूर्ण करुन माहिती संकलित करणा:या जिल्हा प्रशासनाने सर्व याद्या जिल्हा सूचना आणि विज्ञान केंद्र अर्थात एनआयसी सेंटरकडे सोपवल्या आहेत़ यातील सात हजार शेतकरी कुटूंबांची माहिती आतार्पयत पूर्णपणे अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े विशेष म्हणजे मागील 78 हजार कुटूंबांपैकी काहींची नावे त्रुटींमुळे परत आली होती़ त्यांचीही माहिती नव्याने भरली जात आह़े