शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

दारुची बाटली घेण्यासाठी दुकानासमोर रोजंदारीने माणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दारू मिळविण्यासाठी दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे राहण्यात अनेकांना संकोच वाटत असून त्यावर उपाय शोधत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : दारू मिळविण्यासाठी दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे राहण्यात अनेकांना संकोच वाटत असून त्यावर उपाय शोधत आता मद्यपींकडून रांगेत भाडोत्री माणसे उभे करण्यात येत आहेत. त्यातून काही जण दुसऱ्यासाठी रांगेत उभे राहून पैसेही मिळवीत आहेत.लॉकडाऊनमध्ये अटी-शर्तींना अधिन राहून व सोशल डिस्टन्सिंग राखून शासनाने ाद्य विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. परंतु तब्बल दीड महिन्यानंतर मद्यप्रेमींसाठी मद्य विक्री खुली झाल्याने वॉईन शॉपवर गर्दी झाली. परंतु या प्रकाराची पूर्वकल्पना वॉईन शॉप मालकांना असल्याने त्यांनी दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पांढरे वर्तुळ काढून मद्य खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे दारू खरेदीसाठी दुकानासमोर रांगा लागल्या. त्यामुळे अनेकांची पंचाईत झाल्याचे पहायला मिळाले. अनेकांना दारू तर पाहिजे होती पण त्यांना रांगेत उभे राहायला संकोच वाटत असल्याचे पहायला मिळाले. कुणी ओळखीच्या व्यक्तीने दारूसाठी असणाºया रांगेत उभे असल्याचे पाहू नये म्हणून काहींची धडपड दिसून आली. या सर्व अडचणींवर मात करीत मद्यप्रेमींनी नामी शक्कल लढवत रांगेत उभे राहण्यासाठी भाड्याने माणसे मिळविण्यात आली व त्यांना रांगेत उभे करून दारूची खरेदी करताना मद्य शौकिनांकडून पाहायला मिळत आहे. रांगेत उभे राहण्याच्या एका राउंडसाठी भाडोत्री माणसांना ५० ते १०० रुपये देण्यात येत आहेत. दारूच्या ब्रँडवर रांगेत उभे राहणाऱ्यांकडून रांगेत उभे राहण्याचे पैसे आकारले जात असल्याचेही सांगितले जात आहे. सुरुवातीला मद्य शौकिनांना रांगेत उभे राहण्यासाठी भाडोत्री माणसे मिळवावी लागली. मात्र नंतर यातून चांगली कमाई होईल असे लक्षात आल्यावर रांगेत उभे राहून दुसºयाची दारू खरेदी करायला अनेक स्वखुशीने तयार झाल्याचे चित्र वाईन शॉपच्या बाहेर पहायला मिळाले.तळोदा येथे सुरुवातीच्या दोन दिवसात मद्यप्रेमींची वाईन शॉपसमोर चांगलीच गर्दी पहायला मिळाली. मात्र त्यात कमालीची शिस्तही दिसून आली. प्रत्येक ग्राहक वर्तुळात उभा होता. हॉटेल सत्यमपासून डावीकडे तर उजवीकडे सेंट्रल बँकेपावेतो ठराविक अंतर ठेवून मद्यपी दारू खरेदीसाठी रांगेत शिस्तीने उभे दिसून आले. प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर लावण्यात येत होते व नंतरच पैशांची देवाण घेवाण व खरेदी होताना दिसून आली.मद्यपान करणारे सर्वच क्षेत्रातील लोक कमी-अधिक प्रमाणात असून सकाळी आठ ते १२ मर्यादित वेळ असल्याने भरदिवसा रांगेत उभे राहून खरेदी करण्यापेक्षा डमी ग्राहकांना रांगेत उभे राहून बाटली पदरात पाडून घेतली. या भाडोत्री व्यक्तींना दारूच्या विविध ब्रँडची नावे उच्चारता येत नसल्याने अनेकांनी त्यांना कागदावर ब्रॅण्डचे नाव लिहून दिले. तर अनेकांना नंबर लागूनही ब्रॅण्डचे नाव न सांगता आल्याने मद्यापासून वंचित राहावे लागल्याचे किस्सेही घडले.