शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहो दादा...लग्न समारंभात कशी करता येईल हाैस-माैज; जिथे नवरा-नवरीला खांद्यावर घेत निघते वऱ्हाडींची फाैज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:38 IST

खुर्चीमाळ येथे चिवलउतार येथील नवरदेव वऱ्हाड घेऊन आला होता. दुपारी १२ वाजता सांगोबारपाडा गावापर्यंत येऊन तेथून पुढे दोन किलोमीटर रस्ता नसल्याने दरीखोऱ्यासह डोंगरातून पायपीट करत वऱ्हाड खुर्चीमाळ येथे पोहोचले.

वाण्याविहीर (जि. नंदुरबार) : सातपुड्यातील गावांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने लग्नसाेहळ्याच्या आनंदावरही विरजण पडत आहे. यामुळे लग्नात हाैस-माैज करण्याच्या वेळेत नवरदेव-नवरीला थेट खांद्यावर घेत पायपीट करण्याची वेळ वऱ्हाडींवर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात खुर्चीमाळ येथे विवाहासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाला पायपीट करत गावी पोहोचावे लागते. तेथून नवरदेव-नवरीला दोन किलोमीटर पायपीट करत खांद्यावरून आणावे लागत आहे.खुर्चीमाळ येथे चिवलउतार येथील नवरदेव वऱ्हाड घेऊन आला होता. दुपारी १२ वाजता सांगोबारपाडा गावापर्यंत येऊन तेथून पुढे दोन किलोमीटर रस्ता नसल्याने दरीखोऱ्यासह डोंगरातून पायपीट करत वऱ्हाड खुर्चीमाळ येथे पोहोचले. विवाह समारंभ आटोपून वर आणि वधूने एकमेकांसोबत सात जन्माची गाठ बांधली अन् वऱ्हाड परतीला निघाले. रिवाज आणि परंपरेनुसार लग्नानंतर नवदाम्पत्याला मिरवले जाते. परंतु, सांगोबारपाडा गावापर्यंत रस्ता नसल्याने वऱ्हाडींनीच नवरदेव आणि नवरीला खांद्यावर घेत पायपीट सुरू केली.

वर्षानुवर्षे हाल खुर्चीमाळ गावाला रस्ता नसल्याने येथे पाहुणे येण्याचेही टाळतात. अक्कलकुवा तालुक्यातील चिवलउतार, नेंदवण, ओरपा ते खुर्चीमाळ या मार्गावर दोन किलोमीटर अंतराचा रस्ताच नसल्याने त्या मार्गाने कोणी जाऊ शकत नाही. मोठा फेरा करून वऱ्हाडी मंडळीला यावे लागते. वर्षानुवर्षे कायम असलेल्या या समस्येवर जिल्हा प्रशासन मार्ग काढणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

 

टॅग्स :Nanduraनांदूरा