शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सातपुडय़ातील दुर्गम भागात आरोग्यसेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:47 PM

वाण्याविहिर : प्रशासन सातपुडय़ात सातत्याने सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा करत असला तरी अनेक समस्या येथे कायम आहेत़ दुर्गम भागातील ब:याच गावांमधून अद्यापही रूग्णांना आणण्यासाठी ‘बांबूलन्स’चा वापर होत असल्याचे चित्र असून रस्त्यांअभावी ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येऊनही कारवाई करण्याबाबत हालचाली झालेल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े बांबूच्या मोठय़ा ...

वाण्याविहिर : प्रशासन सातपुडय़ात सातत्याने सुविधा देऊन विकास करत असल्याचा दावा करत असला तरी अनेक समस्या येथे कायम आहेत़ दुर्गम भागातील ब:याच गावांमधून अद्यापही रूग्णांना आणण्यासाठी ‘बांबूलन्स’चा वापर होत असल्याचे चित्र असून रस्त्यांअभावी ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येऊनही कारवाई करण्याबाबत हालचाली झालेल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े बांबूच्या मोठय़ा काठीवर चादर किंवा कांबळ बांधून केलेल्या झोळीला बांबूलन्स असे म्हटले जात़े सातपुडय़ातील ब:याच गावांमध्ये गंभीर रूग्ण याच प्रकारे रूग्णालयात पोहोचवले जात आहेत़ गोजरबारीच्या ओहवापाडा ता़ अक्कलकुवा येथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली नाही़ याबाबत पाठपुरावा होऊनही कारवाई झालेली नाही़ यामुळे रूग्णाला गंभीर आजारी पडणा:या रूग्णाला उचलून किंवा झोळी अर्थात बांबूलन्सद्वारे आणावे लागत आह़े ओहवापाडा येथून दोन किलोमीटर उतार चालून ग्रामस्थ खाई ता़ अक्कलकुवा येथील मुख्य रस्त्यार्पयत आणत आहेत़ येथून रूग्णाला मोलगी किंवा अक्कलकुवा येथे रवाना करण्यात येत़े ओहवा ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या गोजरबारीच्या ओहवापाडा येथे दोन किलोमीटर रस्ता निर्मितीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला संपर्क केला होता़ प्रशासनाने या मागणीला गांभिर्याने न घेतल्याने येथील समस्या आजही ‘जैसे थे’ आह़े़