लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ब्राह्मणपुरी व परिसरातील गावांमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.ब्राह्मणपुरी येथील नागरिकांनी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार सुलवाडे आरोग्य केंद्रातर्फे तातडीने अशा बाहेरून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. परंतु या सर्वच नागरिकांमध्ये घसादुखी, ताप, सर्दी, कोरडा खोकला अशी कोणतीच लक्षणे दिसून न आल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी रुग्णांना थोडाफार सर्दी, खोकला असल्याने त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यावेळी आरोग्य उपकेंद्र ब्राह्मणपुरीचे आरोग्यसेवक हिरालाल मराठे, अलका मारनल, एस.जे. वसावे, उपसरपंच माधवराव पाटील, ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील, पोलीस पाटील रवींद्र पवार, सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांवर लक्ष असून शहरातून गावात आलेल्या नागरिकांची लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:10 IST