शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

चिनोद्यात 450 घरांमध्ये आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:07 PM

चिनोदा/तळोदा : तालुक्यातील चिनोदा येथे डेंग्यूसदृश्य तापाचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर पंचायत समिती आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आह़े विभागाने 16 जणांचे पथक याठिकाणी तैनात करून 450 घरांची तपासणी गुरुवारी करवून घेतली आह़े तपासणीदरम्यान डेंग्यूचे पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ चिनोदा येथे अभय किशोर मराठे ...

चिनोदा/तळोदा : तालुक्यातील चिनोदा येथे डेंग्यूसदृश्य तापाचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर पंचायत समिती आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आह़े विभागाने 16 जणांचे पथक याठिकाणी तैनात करून 450 घरांची तपासणी गुरुवारी करवून घेतली आह़े तपासणीदरम्यान डेंग्यूचे पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ चिनोदा येथे अभय किशोर मराठे व देवांशू जयराज मराठे या दोन बालकांना डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाल्याचे बुधवारी समोर आले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी सकाळपासून आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिनोदा येथे दाखल झाले होत़े तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी 16 जणांच्या पथकासह ज्या घरांमध्ये दोघे बालक आजारी पडले तेथे चौकशी करून पाहणी केली़ कर्मचा:यांनी 450 घरांची तपासणी पूर्ण केली़ यातील पाच रूग्ण तापाचे आढळून आल़े डेंग्यू सदृश तापाचा संशयित रूग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी चिनोदा येथे तातडीची ग्रामसभा बोलावण्यात आली़ या ग्रामसभेत वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी डेंग्यूबाबत मार्गदर्शन केल़े प्रसंगी ग्रामस्थांना डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात जन्म घेत असल्याने जास्त काळ पाण्याची साठवण टाळणे गरजेचे आह़े घरातील फ्रिज, कुलर स्वच्छ ठेवले पाहिज़े घराच्या जवळपास रिकामे टायर पडून असल्यास त्याची तपासणी करून पाणी फेकून दिले पाहिज़े  गावातील नागरिकांनी कोरडा दिवस पाळून सहकार्य करण्याची अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली़ गावात आढळून आलेल्या पाच संशयितांच्या रक्त नमुने तपासणीनंतर ते डेंग्यू निगेटिव्ह आढळून आल्याची माहिती आह़े पथकाकडून गावातील प्रत्येक घरात डासांच्या अळ्यांचा शोध घेऊन तपासणी करण्यात आली़ साचलेले डबके, गटारी यांच्यात औषध फवारणी करण्यात आली़ ठिकठिकाणी गटारी आणि सांडपाण्याच्या डबक्यात गप्पी मासेही सोडण्यात आल़े डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायंकाळी संपूर्ण गावात धुरळणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े आरोग्य सेवक ज़ेबी़नाईक, एस़आऱमुळे, एऩएस़ तुपे, व्ही़डी़मोघे, डी़एम़ वळवी, देविदास पावरा, निलिमा वळवी, जिल्हा हिवताप कार्यालयातील क़ेआऱ धारबळे ए़डी़ गुमलाळू, आऱएस़वळवी, एस़व्ही़जाधव, आशा समन्वयक संध्या साळवे, उषाबाई ठाकरे, अरूणाबाई ठाकरे यांनी तपासणी करून रक्तनमुने फवारणी केली़ सरपंच मंजुळाबाई पाडवी, राजेंद्र पाडवी, भास्कर मराठे, ग्रामसेवक क़ेएम़ पावरा यांनीही गावात पाहणी केली़ या तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ़ चव्हाण यांनी गावातील पाण्याचा जलकुंभ स्वच्छ करण्याच्या व  उघडय़ा गटारी बंदिस्त करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या़