शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘हरिहर भेट’ यंदा केली अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेल्या हरिहर भेटीला यंदा दादा व बाबा गणेश मंडळांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेल्या हरिहर भेटीला यंदा दादा व बाबा गणेश मंडळांनी अर्धविराम देण्याचे ठरविले आहे. कोरोनामुळे मिरवणुका निघणार नाहीत. त्यामुळे ही भेटही होणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्याची अधिकृत घोषणा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दोन्ही मंडळांनी केली. शिवाय पारंपारिक रथावरून मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन दुपारपर्यंत आटोपले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.गणेशोत्सवात प्रत्येक भाविकाला आकर्षण असते ते दादा व बाबा गणपतीच्या हरिहर भेटीचे. दरवर्षी सायंकाळी साधारणत: आठ ते दहा वाजेच्या दरम्यान जळका बाजारात ही भेट होते. ही भेट पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा ही भेट होणार की नाही याबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता. निर्णय काय होतो याकडे लक्ष लागून होते. अखेर ही भेट रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नंदुरबारातील मानाच्या दादा गणपतीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येते. दिवसभर मुख्य मिरवणूक मार्गावरून ही मिरवणूक सायंकाळी साडेसात ते आठ वाजता जळका बाजार परिसरात येते. त्याच्या समोरूनच बाबा गणपतीची मिरवणूक देखील येते. दोन्ही गणपतींचे रथ समोरासमोर आल्यावर आरती करण्यात येते. त्यानंतर गुलाल आणि फुलांची उधळण करून भेट साजरा केली जाते. त्यानंतर दादा, बाबा व इतर मानाच्या गणपतींच्या मागे पारंपारिक पद्धतीने तालीम संघाची मंडळे असतात. त्यामुळे या भेटील मोठे महत्व असते.यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या दोन्ही मानाच्या मंडळांसह काका गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुका न काढण्याचे ठरविले आहे. दादा गणपतीचे पदाधिकारी निलेश सोनार, सत्यवान सोनार, सुनील सोनार, नरेंद्र सोनार, उदय सोनार आणि श्री बाबा गणपती उत्सव समितीचे मोरेश्वर सोनार, राकेश सोनार, प्रसाद सोनार, गौरव सोनार, विकास सोनार. काका गणपती मंडळाचे अश्विन सोनार, अरुण सोनार, सागर सोनार यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन त्याबाबतचे लेखी विनंतीपत्र दिले.दोन्ही प्रमुख मंडळे रथावर अथवा इतर कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढणार नाहीत. गणेशमूर्ती चारचाकी वाहनात ठेऊन फक्त दोन किंवा मोजक्या भक्तांकरवी सोनी विहिरीत विसर्जन केले जाणार आहे. मंडळांच्या या निर्णयाबद्दल पोलीस अधीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.