शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हार्डवेअर दुकानांना आग लागून अडीच कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील तालुका खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोरील बुरहानी हार्डवेअर व राज पाईप या दुकानांना मंगळवारी पहाटे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील तालुका खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोरील बुरहानी हार्डवेअर व राज पाईप या दुकानांना मंगळवारी पहाटे एक वाजून ३५ मिनिटांनी अचानक आग लागल्याने दुकानात असलेल्या बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, पीव्हीसी पाईपसह सर्व साहित्य जळून पूर्णत: खाक झाले. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुकानाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आगीने रौद्ररुप धारण केल्याने जिल्ह्यासह शिरपूर, दोंडाईचा व खेतिया येथील अग्निशामक बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. मंगळवारी सकाळपर्यंत दुकानातून आगीच्या ज्वाला येत होत्या.शहादा-दोंडाईचा रस्त्यावर खरेदी-विक्री संघासमोर मुल्ला इस्माईल कायम राजा व शेख इस्माईल शेख गालिब यांच्या राज पाईप बिल्डिंग मटेरियलचे दुकान आहे. याच दुकानाला लागून मुल्ला शब्बीर फजले हुसेन इजी यांच्या बुरहानी हार्डवेअर दुकान आहे. सोमवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास दोन्ही दुकान मालकांनी आपापली दुकाने बंद करून घरी पोहोचले होते. मध्यरात्रीनंतर एक वाजून ३५ मिनिटांनी राज पाईप या दुकानाच्या प्रथमदर्शनी भागाला आग लागली. शहरातील देवा चौधरी हे इंदूर येथून शहादा येथे आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यानंतर त्यांनी मुल्ला इस्माईल राजा व इतरांना या घटनेची माहिती तातडीने दिली. घटनास्थळी दुकानदार तसेच दाऊदी बोरी समाजातील सर्वच युवक पोहोचले. त्या दरम्यान शहादा नगरपालिका व सातपुडा साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नंदुरबार, तळोदा, शिरपूर, दोंडाईचा व खेतिया येथील अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले. पहाटेपर्यंत आग विझवण्यात अग्निशामक बंबांना यश आले. तरीही सकाळी सात-आठ वाजेच्या दरम्यान दुकानातून धूर बाहेर निघत होता. राज पाईप या दुकानात बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक पाईप, प्लास्टिकच्या टाक्या, लोखंडी वस्तू तर बुरहानी हार्डवेअर या दुकानातही पीव्हीसी पाईप, बिल्डिंग मटेरियल, प्लास्टिकच्या टाक्या, बांधकामासाठी लागणारे साहित्य होते. या आगीत दोन्ही दुकानातील सर्व साहित्य पूर्णत: खाक झाले आहे.या दुकानांच्या बाजूला प्रकाश जैन यांचे वास्तव्य असून खाली श्रीराम मेडिकल हे दुकान आहे. आगीचा सर्व धूर त्यांच्या घरात जात होता. त्यांनी मेडिकलमधील औषधी व घरातील साहित्य इतरत्र हलविले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रात्री या परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठी हानी टळली.२००८ मध्ये शहरातील जुन्या पोलीस स्टेशनसमोर असलेल्या सज्जाद आॅटोमोबाइल व ताहेरी हार्डवेअर या दुकानांनाही पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. या आगीत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज पाईप व बुरहानी हार्डवेअर या दुकानांना मंगळवारी अचानक आग लागल्याने दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत शहादा पोलिसात घटनेची नोंद सुरू होती. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी तातडीने पोलीस बंदोबस्त लावून गर्दी नियंत्रणात आणली. आगीचे स्पष्ट कारण मात्र समजू शकले नाही.आगीच्या घटनेची माहिती मिळताच दाऊदी बोहरी समाजाचे युवकांपासून वयोवृद्धांनी व शहरातील अनेक नागरिक घटनास्थळी पोहोचून दुकानात असलेला माल काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. राज पाईप दुकानाचे मालक मुल्ला इस्माईल राजा तसेच बुराहनी हार्डवेअरचे मालक मुल्ला शब्बीर इजी यांनी आग पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना अक्षरश: अश्रूच्या धारा लागल्या होत्या. सुन्न झालेल्या या दोन्ही दुकान मालकांना समाज बांधव व नागरिक धीर देत होते.