हार्डवेअर दुकानांना आग लागून अडीच कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:17 PM2020-02-26T13:17:48+5:302020-02-26T13:17:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील तालुका खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोरील बुरहानी हार्डवेअर व राज पाईप या दुकानांना मंगळवारी पहाटे ...

 The hardware shops suffered a loss of two and a half crores | हार्डवेअर दुकानांना आग लागून अडीच कोटींचे नुकसान

हार्डवेअर दुकानांना आग लागून अडीच कोटींचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील तालुका खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोरील बुरहानी हार्डवेअर व राज पाईप या दुकानांना मंगळवारी पहाटे एक वाजून ३५ मिनिटांनी अचानक आग लागल्याने दुकानात असलेल्या बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, पीव्हीसी पाईपसह सर्व साहित्य जळून पूर्णत: खाक झाले. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुकानाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आगीने रौद्ररुप धारण केल्याने जिल्ह्यासह शिरपूर, दोंडाईचा व खेतिया येथील अग्निशामक बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. मंगळवारी सकाळपर्यंत दुकानातून आगीच्या ज्वाला येत होत्या.
शहादा-दोंडाईचा रस्त्यावर खरेदी-विक्री संघासमोर मुल्ला इस्माईल कायम राजा व शेख इस्माईल शेख गालिब यांच्या राज पाईप बिल्डिंग मटेरियलचे दुकान आहे. याच दुकानाला लागून मुल्ला शब्बीर फजले हुसेन इजी यांच्या बुरहानी हार्डवेअर दुकान आहे. सोमवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास दोन्ही दुकान मालकांनी आपापली दुकाने बंद करून घरी पोहोचले होते. मध्यरात्रीनंतर एक वाजून ३५ मिनिटांनी राज पाईप या दुकानाच्या प्रथमदर्शनी भागाला आग लागली. शहरातील देवा चौधरी हे इंदूर येथून शहादा येथे आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यानंतर त्यांनी मुल्ला इस्माईल राजा व इतरांना या घटनेची माहिती तातडीने दिली. घटनास्थळी दुकानदार तसेच दाऊदी बोरी समाजातील सर्वच युवक पोहोचले. त्या दरम्यान शहादा नगरपालिका व सातपुडा साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नंदुरबार, तळोदा, शिरपूर, दोंडाईचा व खेतिया येथील अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले. पहाटेपर्यंत आग विझवण्यात अग्निशामक बंबांना यश आले. तरीही सकाळी सात-आठ वाजेच्या दरम्यान दुकानातून धूर बाहेर निघत होता. राज पाईप या दुकानात बिल्डिंग मटेरियलसह प्लास्टिक पाईप, प्लास्टिकच्या टाक्या, लोखंडी वस्तू तर बुरहानी हार्डवेअर या दुकानातही पीव्हीसी पाईप, बिल्डिंग मटेरियल, प्लास्टिकच्या टाक्या, बांधकामासाठी लागणारे साहित्य होते. या आगीत दोन्ही दुकानातील सर्व साहित्य पूर्णत: खाक झाले आहे.
या दुकानांच्या बाजूला प्रकाश जैन यांचे वास्तव्य असून खाली श्रीराम मेडिकल हे दुकान आहे. आगीचा सर्व धूर त्यांच्या घरात जात होता. त्यांनी मेडिकलमधील औषधी व घरातील साहित्य इतरत्र हलविले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रात्री या परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठी हानी टळली.
२००८ मध्ये शहरातील जुन्या पोलीस स्टेशनसमोर असलेल्या सज्जाद आॅटोमोबाइल व ताहेरी हार्डवेअर या दुकानांनाही पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. या आगीत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज पाईप व बुरहानी हार्डवेअर या दुकानांना मंगळवारी अचानक आग लागल्याने दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत शहादा पोलिसात घटनेची नोंद सुरू होती. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी तातडीने पोलीस बंदोबस्त लावून गर्दी नियंत्रणात आणली. आगीचे स्पष्ट कारण मात्र समजू शकले नाही.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच दाऊदी बोहरी समाजाचे युवकांपासून वयोवृद्धांनी व शहरातील अनेक नागरिक घटनास्थळी पोहोचून दुकानात असलेला माल काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. राज पाईप दुकानाचे मालक मुल्ला इस्माईल राजा तसेच बुराहनी हार्डवेअरचे मालक मुल्ला शब्बीर इजी यांनी आग पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना अक्षरश: अश्रूच्या धारा लागल्या होत्या. सुन्न झालेल्या या दोन्ही दुकान मालकांना समाज बांधव व नागरिक धीर देत होते.

Web Title:  The hardware shops suffered a loss of two and a half crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.