नवापुरात कोरोनाविषयी मार्गदर्शक बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:33 PM2020-04-01T12:33:19+5:302020-04-01T12:33:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिड हजाराहुन अधिक जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले असुन ग्रामीण भागात सरपंच ...

Guide Meeting on Corona in Navapura | नवापुरात कोरोनाविषयी मार्गदर्शक बैठक

नवापुरात कोरोनाविषयी मार्गदर्शक बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिड हजाराहुन अधिक जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले असुन ग्रामीण भागात सरपंच व ग्रामसेवक यांचा समावेश असलेल्या ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समिती कार्य करीत असल्याची माहिती आमदार शिरिष नाईक यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आली. शहरात १ हजार १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नवापूर शहरातील प्रभागांसाठी उपाय योजना व नियोजनावर प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपाध्यक्ष आरीफभाई बलेसरीया, गटनेते आशिष मावची, विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, नगरसेवक महेंद्र सोनार, विश्वास बडोगे, हारूण खाटीक, यश अग्रवाल, अजय पाटील, शिवसेनेचे हसमुख पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार, प्रकाश कुंभार, फारूख शाह, तानाजी वळवी आदि उपस्थित होते.
बैठकीत नवापूर पालिका हद्दीतील शहरातील सर्व प्रभागातील १ हजार १०० नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची किट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यात आज एक हजार ५४० जणांना होमकोरन्टाइन करण्यात आले आहे अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी बैठकीत दिली. तालुक्यात रात्री अपरात्री चोरट्या मागार्ने बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासाठी तालुक्यात आरोग्य विभागाचे ४५ पथक काम करीत आहे. त्यांच्या मदतीला ३४७ अंगणवाडी सेविका, ७०० आशा वर्कर आहेत.
तालुक्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याचे नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले. आमदार नाईक यांनी तालुक्याची माहिती नंदकुमार वाळेकर यांचेकडुन जाणुन घेत उपाययोजना सुचवल्या़

Web Title: Guide Meeting on Corona in Navapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.