शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’चा फटका : ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ योजना नावालाच, शेती अवजारे खरेदीत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:05 IST

शेती अवजारे व यंत्रांवर १२ ते १८ टक्के ‘जीएसटी’ लावण्यात आला आहे़ परिणामी अवजारे व यंत्र खरेदीत मोठीच घट आली आहे.

संतोष सूर्यवंशी/ नंदुरबार : शेती अवजारे व यंत्रांवर १२ ते १८ टक्के ‘जीएसटी’ लावण्यात आला आहे़ परिणामी अवजारे व यंत्र खरेदीत मोठीच घट आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद व राज्य कृषी विभागाकडून कृषी अवजारांवर देण्यात येणा-या अनुदानात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

आर्थिक वर्ष संपायला केवळ तीन महिन्यांचा कालावधी बाकी असताना ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत राज्य कृषी विभागाच्या नंदुरबार उपविभागात केवळ ११३ लाभार्थ्यांनीच शेती अवजारांच्या अनुदानाचा लाभ घेतला आहे. त्यात, नंदुरबार ७७, नवापूर २३, अक्कलकुवा १३ शेतक-यांचा समावेश आहे़ तर शहादा उपविभागात, शहादा ५७, तळोदा २० तर धडगाव ४ असे एकूण केवळ ८१ लाभार्थी आहेत.

दरम्यान, दुसरीकडे ‘जीएसटी’ कर प्रणाली सुरू होण्याआधी म्हणजे २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेती अवजारांसाठी २ हजार ९७७ शेतक-यांना अनुदान मिळाले होते़ यासाठी कृषी विभागाकडून ८ कोटी ४१ लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता.

आता शेती अवजारांमध्ये १२ ते १८ टक्के इतका ‘जीएसटी’ लागू करण्यात आला आहे. त्यामुळ्य शेतक-यांना दुहेरी आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे़ एकीकडे शेती उपयोगी अवजारे खरेदी करीत असताना, जीएसटीसह वाढीव किंमत मोजावी लागत आहे तर दुसरीकडे कृषी विभागातर्फे देण्यात येणारे अनुदानही ‘जैसे थे’ आहे. लाभार्थ्यांची होतेय शोधाशोध. शेती अवजारांचे अनुदान वितरित करण्यासाठी लाभार्थ्यांची शोधाशोध करावी लागत आहे. शेती अवजारांच्या अनुदानासाठी प्रस्ताव मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.तालुका कृषी अधिका-यांकडून त्या-त्या तालुक्यांतील लाभार्थी शेतक-यांकडून शेती अवजारांच्या अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात येत असतात़ त्यानंतर सर्व लाभार्थ्यांचे प्रस्ताव एकत्रित करुन सोडत पध्दतीने काढून सर्वांना अनुदान दिले जाते.

शेतक-यांना अगोदर आपल्याला लागणा-या शेती अवजारांच्या खरेदीसाठी तालुका कृषी विभागाकडून संमती घेणे आवश्यक असते़ त्यानंतर प्रथम शेतकरी स्वत:चे पैसे खर्च करुन ते अवजार, यंत्र खरेदी करीत असतो़ त्यानंतर संबंधित खरेदीची बिल व आवश्यक कागदपत्रे तो तालुका कृषी विभागाला सादर करीत असतो़ त्यानंतर ‘डीबीटी’ पध्दतीने त्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरी