Grounding advisers of Narmada Authority | नर्मदा प्राधिकरणाच्या सल्लागारांना घेराव
नर्मदा प्राधिकरणाच्या सल्लागारांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नर्मदाकिनारी मत्स्य व्यवसायासंबंधात पिंज-यातील मत्स्यसंवर्धनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. नर्मदा सरोवर प्राधिकरणाचे सल्लागार डॉ.अफरोज अहमद यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाला नर्मदा आंदोलकांनी आक्षेप घेत त्यांना काही काळ घेराव घातला. तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबतही त्यांना जाब विचारला.
याबाबत आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सरदार सरोवर जलाशयामध्ये मत्स्यव्यवसाय हा विस्थापित आदिवासी व पारंपारिक मच्छीमारांच्या सहकारी समित्यांमार्फत चालतो आहे. या अधिकारासाठी नर्मदा बचाओ आंदोलनाने अनेक वर्षे संघर्ष केला तसेच राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर संवादही केला. पुनर्वसनामध्ये ह्या आजीविकेचा अधिकाराचा आग्रहही धरला. महाराष्ट्रात पाच व मध्य प्रदेशात 31 समितींची नोंदणी झाली. मात्र कार्यक्रमात सहकारी सोसायट्यांचा उल्लेखही नाही. उद्घाटनाचा घाट डॉ.अफरोज अहमद यांच्या हस्ते घातला यावर हरकत घेणे आवश्यक आहे. सहकारी सोसायट्यांचे कार्यक्रमात स्थान काय याचाही विचार अधिका-यांनी करणे गरजेचे असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
अहमद यांनी मध्यप्रदेशातील 192 गावे व एक नगर सरदार सरोवर बाधित असताना तिथे पूर्ण दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा जेव्हा मोचार्ने गेलो तेव्हा प्रदीर्घ चर्चा आमच्यासह केली मात्र कार्य नाही व खरी आकडेवारी, अहवालही नाही. पुनर्वसनाच्या कार्याचा दाखवल्यानंतर पुढील वार्षिक अहवालात 2,143 कुटुंबांना जमीन देणे बाकी असल्याचे अहमद यांनीच दाखविले.  अहमद सल्लागार होऊ शकत नाहीत. असेही आंदोलकांनी ठामपणे सांगितले.

विस्थापीतांच्या विविध प्रश्नांसदर्भात विस्थापीतांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू केले आहे. दुस:या दिवशी देखील आंदोलन कायम होते. शनिवारी सायंकाळी उशीरार्पयत नर्मदा प्राधिकरणाच्या कार्यालयात चर्चा सुरू होती. त्यात विविध मागण्या लेखी घेण्यासाठी आंदोलक आग्रही होते. 

गेल्या दोन दिवसांपासून शेकडो विस्थापीत नंदुरबारात ठाण मांडून आहेत. त्यांच्या प्रश्नांसदर्भात आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, लतिका राजपूत, नुरजी वसावे, सियाराम पाडवी, चेतन साळवे, ओरसिंग पटले बाजू मांडत होते. सायंकाळी उशीरार्पयत यासंदर्भातील चर्चा सुरू होती. 
 


Web Title: Grounding advisers of Narmada Authority
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.