शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 08:59 IST

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले

किशोर मराठे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाण्याविहीर (जि. नंदुरबार): सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात अद्यापही धड रस्ते नसल्याने एका नवरदेवाला सुमारे २० किलोमीटर वऱ्हाडी मंडळींच्या खांद्यावर बसून नवरीचे आंबापाडा हे गाव गाठावे लागले. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम केवडी ते जांगठी या पायवाटेने पूर्ण वऱ्हाडी मंडळींनीही पायपीट करीत लग्नमंडप गाठला. दरवर्षी कोट्यवधींचा मिळणारा निधी कागदावर खर्च होतो परंतु रस्त्यांची लागलेली वाट तशीच राहते.  

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले

नवरदेवाला नेण्याची जबाबदारी दऱ्याखोऱ्यातील अवघड पायवाटांवर चालण्यात तरबेज असलेल्या युवकांवर सोपविली होती. तरीही सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारपर्यंत मंडपात पोहोचले.

परतीचा प्रवासही तसाच

  • केवडी येथील नवरदेवाने नवरीचे गाव गाठण्यासाठी वऱ्हाडीच्या खांद्यावर सुमारे २० किलोमीटर अंतर कापले. लग्न लावून पुन्हा नवरीला सोबत घेत पायवाटेनेच आपल्या गावी परतले. 
  • केवडीच्या कोतवालपाडा येथील मिथुन खिमजी वसावे या नवरदेवाचा २० किमी अंतरावरील आंबापाडा येथील युवतीशी १२ जूनला विवाह होता. एरवी ‘दुल्हेराजा’ आणि वऱ्हाडी मंडळींची आलिशान वाहनांमधून ‘एंट्री’ होते. मात्र, वाहन तर सोडा साधे पायी चालणेही कठीण असल्याने नवरदेवाला खांद्यावरून नवरीचे गाव गाठावे लागले. 
टॅग्स :marriageलग्न