शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:10 IST

शेतकरी संघटनेचा आरोप : विविध मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देआठ महिने कांदा साठवूनही मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत.

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून २५० रूपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला आहे. दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला असून शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या वेगाने वाढते आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहे शिवाय, राम मंदिर, आरक्षण या विषयांमुळे शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला असून शेतक-यांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च झाला. आठ महिने कांदा साठवूनही मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने त्वरित आयात निर्यात धोरणात सुधारणा करून शेतक-यांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेतक-यांमध्ये नाराजीचा सूरयंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतक-यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, प्रसंगी टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगवला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतक-यांमध्ये सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतक-यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा