शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात गोडाऊनला आग लागून दीड कोटींचे नुकसान

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: October 30, 2023 18:54 IST

आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्याचे काम सुरु होते.

नंदुरबार : शहरातील मेमन कॉलनीत सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्र्याच्या गोडाऊनला आग लागून गोडावूनमधील टीव्ही, फ्रीज, कुलर, पत्रावळी, ग्लास व इतर साहित्य, सोडा बॉटल, खाद्यपदार्थ जळून राख झाली. दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेला इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू या आगीत खाक झाल्या. सुमारे दीड कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्याचे काम सुरु होते.

शहरातील डोंगरगाव रस्त्यालगत श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर मेमन वसाहतीत पत्र्याचे आठ-दहा गाळ्यांचे शेड व गोडावून आहे. या गोडाऊनला सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागून रुपेश भट यांच्या मालकीचे शक्ती प्लाझामधील दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज, टिव्ही, कुलर, चक्की, स्पीकर यासह बिले, चेकबुक, खरेदीचे बील आदी कागदपत्रे जळून खाक झाली. धर्मेद्र नहाटा यांच्या दुकानातील इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले. 

याच ठिकाणी रियाज शेखाणी यांचा पत्रावळी, पेपर कप व प्लास्टीकचे इतर साहित्य बनविण्याचा कारखाना आहे. त्यांचे मशिनरीसह साहित्य जळाले आहे. दादाभाई इसाणी यांचे इलेक्ट्रिनिक साहित्याचे दुकान व राजू सोडावाला, अझर इसाणी यांचे गॅस  भरण्यासाठी असलेले  मशीन आगीत भस्म झाले आहे. पाच-सहा गोडाऊनमधील सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे साहित्य व मशिनरी जळाली आहे. 

टॅग्स :fireआग