समशेरपूर साखर कारखान्याचा हंगाम संपल्याने जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:48 PM2020-02-25T13:48:06+5:302020-02-25T13:48:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : कुठलीही अनुचित घटना न घडता समशेरपूर ता. नंदुरबार येथील आयान साखर कारखान्याचा हंगाम ...

Glorious as the seasonal sugar factory is over | समशेरपूर साखर कारखान्याचा हंगाम संपल्याने जल्लोष

समशेरपूर साखर कारखान्याचा हंगाम संपल्याने जल्लोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : कुठलीही अनुचित घटना न घडता समशेरपूर ता. नंदुरबार येथील आयान साखर कारखान्याचा हंगाम संपला. त्यामुळे शेतकरी, कामगार व कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला
समशेरपूर येथील आयान मल्टीलिक्वीड अलाईड साखर कारखान्यांमार्फत नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगामाला सुरुवात करण्यात आली होती. चार महिन्याच्या कालावधीत कारखान्यामार्फत तीन लाख टनापेक्षा अधिक ऊसाचे गाळप कण्यात आले. या कारखान्याला कोरीट, लहान शहादे, शिंदे, कोळदा, प्रकाशा यासह अन्य गावशिवारातील शेतकऱ्यांकडून ऊस देण्यात आला. या ऊसाच्या माध्यमातून कारखान्याने साखरेचे चांगले उत्पादन केल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस तोळणीसाठी कारखाना परिसरात कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, साक्री, धडगाव, शिरपूर व शिंदेखेडा, शहादा या तालुक्यांमधून ऊसतोड कामगार दाखल झाले होते.
या गाळप हंगामात कारखान्याच्या ठिकाणासह कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कुठलाही अनचित प्रकार तथा घटना दिसून आली नाही. कारखान्याचे सर्व कामकाज सुरळीत पार पडत हंगाम संपल्यामुळे ऊस वाहतुक करणाºया अखेरच्या बैलगाडीचे पूजन करण्यात आले. कारखान्यात सर्व कामकाज चांगले झाल्यामुळे कारखान्यासाठी काम करणारे ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगार, शेतकरी यांच्यासह कारखान्याच्या पदाधिकाºयांनी गुलाल उधळत कारखान्याच्या आवारातच जल्लोष केला. या जल्लोषात गट पर्यवेक्षक विनोद मराठे, नितीन सोनवणे, निलेश पाटील, कांतीलाल मराठे, राजेश भिल, दीपक पटेल, वासुदेव पाटील, मुकादम रामलाल राठोड, धारासिंग चव्हाण, कारखान्याचे एम.डी. आर.सी. बडगुजर, मुख्य शेतकी आधिकारी ए.आर. पाटील, लेखापाल पद्माकर टापरे, सुरक्षा अधिकारी एन.डी. बागुल यांच्यासह सर्व कामगार सहभागी झाले होते.

Web Title: Glorious as the seasonal sugar factory is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.