लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराच्या मध्यभागी असलेले श्रीग़णेश पंचायतन गणपती मंदीर भाविकांचे श्रद्धास्थान आहे़ शिवकालीन असलेला येथील गणपती बाप्पा मनोकामना पूर्ण करत असल्याने वर्षभर येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात़शिवकालीन असलेले गणपती मंदिर पूर्वी कौलारू होते़ या मंदिराच्या परिसरातून नाला वाहत असल्याने त्यालाच गणपती नाला म्हणून ओळखले जात होते़ शहरात अनेक वर्षे हाच मुख्य नाला होता़ ४ आॅगस्ट १९८६ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला़ नंदुरबारचे रहिवासी व मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहणारे सन्मखुभाई नानालाल शाह यांनी स्वखर्चाने दाक्षिणात्य कारागीरांकडून हे मंदिर तयार करुन घेतले होते़ २०१२ मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे गणेय याग आयोजित करण्यात आला होता़ सोबत ११ पुरोहितांद्वारे सहस्त्रावर्तनही करण्यात आले होते़ मंदिराच्या गाभाऱ्यातील श्री गणपतीची आकर्षक आणि देखणी अशी उजव्या सोंडेची मूर्ती आहे़ मंदिरात उजव्या बाजूला पंचमुखी शिवलिंग पांढºया पाषाणाचे असून विशेष म्हणजे शिवलिंगाजवळ नंदी प्राचीन काळापासून असल्याचे सांगण्यात येते़ ही मूर्ती पशुपतीनाथ म्हणून ओळखली जाते़ डाव्या बाजूला श्री अष्टभूजादेवीची पांढºया पाषाणाची मूर्ती आहे़ या मंदिराची देखभाल प्रदीप नथ्थू भट करतात़ त्यांचे वडील नथ्थू फकिरा भट हे या मंदिरात पौरहित्य करत होते़ त्यांच्यानंतर प्रदीप भट हे मंदिराचे कामकाज पाहत आहेत़ मंदिररात दरवर्षी भाद्रपद चर्तुदर्शीला श्रींच्या मूर्तीवर चांदीच्या विविध अलंकारांनी व भरजरी वस्त्रे चढवली जातात़ यावेळी पुरोहितांद्वारे मंत्रपुष्पाचा कार्यक्रम होतो़ नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराची ख्याती आहे़ दरवर्षी गणेशोत्सवात मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई केली जाते़गणपती मंदिर हे शहरासह राज्याच्या विविध भागातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे़ नवसाला पावणारा बाप्पा असल्याने भाविक वर्षभर येथे हजेरी लावतात़ वर्षभर होणाºया धार्मिक उपक्रमांमुळे चैतन्य असते़ कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी बाप्पा हे विघ्नही दूर करेल़-प्रदीप भट, पुजारी,गणपती मंदिर, नंदुरबाऱ