शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अधांतरी!

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: June 14, 2018 12:09 IST

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न यंदाही रेंगाळला आहे. आघाडी शासनाच्या काळात अर्थात पाच वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दूरदृष्टी ठेवून नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आणले होते. परंतु विविध कारणांनी ते रेंगाळले. भाजप सरकारच्या काळात पुन्हा त्याला उभारी मिळाली, विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न यंदाही रेंगाळला आहे. आघाडी शासनाच्या काळात अर्थात पाच वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दूरदृष्टी ठेवून नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आणले होते. परंतु विविध कारणांनी ते रेंगाळले. भाजप सरकारच्या काळात पुन्हा त्याला उभारी मिळाली, विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबारात त्याची घोषणा केली, परंतु पुढे फारशा हालचाली झाल्या नाहीत. परिणामी केंद्र शासनाने मंजुरी नाकारली आहे. पुढे आणखी काय घडामडी होतात, महाविद्यालय येथे सुरू होते किंवा नाही याकडे आता लक्ष लागून आहे. नंदुरबारात विविध उच्च शिक्षणाची सोय होत आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय येथे सुरू झाले आहे. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये विविध विषयांचे अभ्यासक्रमांची सोय आहे.  राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा देखील नंदुरबारातच सुरू झाली आहे. त्यातच आता वैद्यकीय महाविद्यालयाची भर पडणार होती. त्यामुळे आदिवासी भागात वैद्यकीय शिक्षणाच्या सोयीसह आरोग्य सेवा देखील सुधारली असती. परंतु पाठपुरावा आणि तांत्रिक बाबीच्या अडचणींमुळे गेल्या सहा वर्षात येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर होऊनही सुरू होऊ शकले नाही.वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले किमान 500 बेडच्या रुग्णालयाची नंदुरबारात वाणवा आहे. सध्या जिल्हा रुग्णालय 250 बेडचे आहे. नव्याने मंजुर झालेले महिला रुग्णालय 100 बेडचे राहणार आहे. नुकतीच मंजुरी मिळालेल्या आयुष रुग्णालयात देखील 50 बेड राहणार आहेत. तरीही 100 बेडची कमतरता राहते. वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत 100 बेडचे रुग्णालय सुरू करून 500 बेडची क्षमता पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून जिल्हा रुग्णलयाच्या आवारात नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचे कार्यालय देखील सुरू करण्यात आले होते. परंतु या कार्यालयात अभावानेच कुणी अधिकारी दिसून आले. केवळ नावालाच हे कार्यालय येथे सुरू होते. पुर्णवेळ अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत आवश्यक त्या बाबींची पुर्तता करून घेतली असती तर महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला असता. जिल्हा रुग्णालय संबधित विभागाकडे हस्तांतराची प्रक्रिया देखील केली गेली नव्हती. शिवाय महाविद्यालयासाठीच्या जागेच्या निश्चितीबाबत देखील फारशी उत्सूकता दाखविली गेली नाही. त्यामुळे तेंव्हाच वैद्यकीय महाविद्यालयाच्या भविष्याबाबत शंका निर्माण झाली होती. शिवाय या महाविद्यालयाच्या पाठपुराव्यासाठी जिल्ह्यातील मंत्री राहिले असते तर त्यात आणखी भर पडली असती. आघाडी शासनाच्या काळात मंत्रीपदी असतांना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी अनेक बाबींची पुर्तता करून घेतली होती. शिवाय नियमित पाठपुरावा देखील होता. परंतु भाजप शासनाच्या काळात जिल्ह्याला मंत्रीपदच नसल्यामुळे त्याचा तोटा सहन करावा लागल्याचे चित्र आहे. नंदुरबारात आयोजित महाआरोग्य मेळाव्यात मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी खान्देशात दोन अर्थात जळगाव आणि नंदुरबार हे दोन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याची घोषणा केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात सर्व प्रक्रिया पुर्ण करून यंदापासून महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे.जिल्ह्यातील विशेषत: दुर्गम भागातील आरोग्य सेवेची स्थिती पहाता वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज होती. या माध्यमातून स्थानिक ठिकाणीच उपचार आणि संदर्भ सेवा देखील मिळाल्या असत्या. आता तरी यापुढे वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी पाऊल उचलावे, शासन स्तरावर पाठपुरावा कायम ठेवावा अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.