शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शहाद्यातील बाजारपेठेत सोशलडिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:10 PM

n  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाकडून नियम शिथिल करत मिशन बिगिन अगेन ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाकडून नियम शिथिल करत मिशन बिगिन अगेन अंतर्गत व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून जनतेला या काळात गर्दी न करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, याला विक्रेते व नागरिक गांभीर्याने न घेता खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत व मास्क न वापरून प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या रोज चाचणीत पॉझीटिव्ह येणाऱ्या रूग्णांमध्ये शहादा तालुक्यातीलच रूग्णांची संख्या जास्त येत असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे.शहरातील बाजारपेठात नागरिकांनी दिवाळीत व नंतरदेखील खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. मात्र अनेकजण तर विनामास्क बाजारपेठेत फिरतानाही दिसत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोनाला नागरिक खुले आमंत्रण तर देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांची ही बेफिकीरी पुन्हा कोरोनाला आमंत्रण देत आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल. पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपल्या येथेही पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येऊ नये यासाठी नागरिकांनी स्वत: आपली जबाबदारी ओळखून काळजी घेणं आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.ऑक्टोंबर महिन्यात लुळा पडलेला कोरोना विषाणू पुन्हा डोकेवर काढत आहे का असे मागील चार दिवसात शहादा तालुक्यातील ७१ रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर वाटू लागले आहे. आजअखेर एकूण दोन हजार १९१ रूग्ण बाधीत झाले असून, त्यातील दोन हजार ५३ रूग्ण बरे झाले आहेत. ८६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात रूग्णांची वाढलेली संख्या बघता शहादेकरांसाठी हा चिंतेच्या विषय ठरू शकतो. यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.'जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही' असं वारंवार सांगूनदेखील नागरिकांमध्ये काहीच फरक दिसून येत नाही. जसं काय कोरोना हा गेलाच अशी परिस्थिती बाजारपेठत आता निर्माण झाली आहे. सध्यातरी कोरोनावर एकमेव औषध म्हणजे काळजी घेणे हेच आहे. तरीदेखील बाजारपेठेत फेरफटका मारताना दिसून येतो की अनेकजन कोरोनाबद्दल काळजी घेताना दिसून येत नाही. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे नागरिक विसरले आहेत.शहादा शहरात मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तसेच शहरातील विविध भागात ठेला गाडीवर मोठ्या प्रमाणावर विक्रेते फळ व भाजीपाला विकतात. मात्र हे विकताना त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंबलबजावणी करणे आवश्यक असताना ते कोरोना संदर्भात असलेली कोणतीच काळजी घेताना दिसत नसून विक्री करताना तोंडाला मास्क देखील लावलेले नाही. याबाबत काही विक्रेत्यांना हटकले असता. त्यांनी आता कोरोना गेला, संपलेला आहे, आता काही होत नाही असा समज त्यांच्यात असून ते बिनधास्तपणे कोणालाही न जुमानता शासनाच्या नियमांची पायमल्ली करत फळे व भाजीपाल्याची विक्री करताना दिसून येत आहेत. फळे - भाजीपाला ही रोज आणि नियमित लागणारी गरज आहे त्यामुळे विक्रेत्याकडे लोकांचे येणे जाणे चालू असते. अश्यामुळे कोरोनाचे संक्रमांचे देवाण घेवाण चालू होऊ शकते व संसर्गाचा धोका वाढू शकतो. नियम न पाळत कोरोनाचा फैलाव करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणाऱ्यां व्यावसायिकांच्या संबंधितांनी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी ज्या विक्रेत्याने मास्क लावला नसेल त्यांच्याकडे वस्तू खरेदी न करण्याच्या निर्णय घेतल्यास फायद्याचे ठरू शकेल.