शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कोरोनामुळे पिकांची राखणदारी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दरोडेखोरांच्या टोळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत़ यामुळे शेतकºयांनी काढणी केलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत़ यामुळे शेतकºयांनी काढणी केलेली पिके शेतात असून या पिकांची राखणदारी करणाºया दोघा शेतकºयांसह रखवालदारावर दरोडेखोरांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली़ याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत़धरमदास मंगल पाटील व रविंद्र तुकाराम पाटील हे दोघे शेतकरी आणि रखवालदार लालसिंग फुल्या वळवी अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत़ कोरोनामुळे बाजार समिती बंद असल्याने औरंगपूर शिवारातील शेतात धरमदास पाटील, रविंद्र पाटील व लालसिंग वळवी हे मुक्कामी होते़ काढणी केलेल्या हरभरा उत्पादनाची तिघेही रखवालदारी करत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्याने तिघांवर अचानक हल्ला चढवला़ घाबरून या तिघांनी शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू टोळक्याने तिघांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली होती़ मारहाणीत धरमदास पाटील हे गंभीर जखमी झाले़ तर रविंद्र पाटील लालसिंग वळवी यांना मार लागला आहे़ चोरट्यांनी तिघांकडून दोन मोबाईल आणि साडेतीन हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेला़दोन मोटारसायकलींची तोडफोड केली़ तिघांनी आरडओरड केल्यानंतर टोळक्याने येथून पळ काढला़ याबाबत धरमदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात १० ते १२ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनास्थळी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक नजन पाटील व व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने भेट देऊन माहिती घेतली होती़