दाम दुप्पटच्या नावाखाली सव्वा लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:42 AM2019-07-15T10:42:05+5:302019-07-15T10:42:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दाम दुप्पटसाठी दिलेले एक लाख 30 हजार रुपये हडप केल्याप्रकरणी धुळे व शहादा येथील ...

Fraud in Savva Lakha under the name of doubling | दाम दुप्पटच्या नावाखाली सव्वा लाखात फसवणूक

दाम दुप्पटच्या नावाखाली सव्वा लाखात फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दाम दुप्पटसाठी दिलेले एक लाख 30 हजार रुपये हडप केल्याप्रकरणी धुळे व शहादा येथील दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास दिलीप अहिरे, रा.भिमनगर, धुळे व धर्मेद्र जिवनराम बारोट, रा.लोणखेडा, ता.शहादा असे दोन्ही संशयीतांची नावे आहेत. उंटावद, ता.शहादा येथील रतिलाल रमेश पावरा यांनी जानेवारी 2011 ते 2016 दरम्यान एक लाख 30 हजार रुपये दामदुप्पट करण्यासाठी दिले होते. त्यांनी सुरत येथील लाईफ इनोव्हेटीक कार्पोरेशन इंडिया लिमिटेड या कंपनीत पैसे गुंतवले होते. परंतु नंतर दामदुप्पट तर नाहीच मुद्दल देखील मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रतिलाल पावरा यांनी 13 जुलै रोजी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.  
विलास अहिरे व धर्मेद्र बारोट यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       तपास फौजदार रामेश पाटील करीत आहे. 
 

Web Title: Fraud in Savva Lakha under the name of doubling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.