शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शहरी भागात चारच दिवस रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

तळोदा : शासनाच्या रेशन माल वितरणासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने नवीन गाइड लाइन्स दिल्या असून या महिन्यात शहरात चारच दिवस ...

तळोदा : शासनाच्या रेशन माल वितरणासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने नवीन गाइड लाइन्स दिल्या असून या महिन्यात शहरात चारच दिवस दुकाने उघडून सकाळी सात ते दुपारी एक वाजेपावेतोच ग्राहकांना माल देण्याचे सूचित केले आहे. तथापि ग्रामीण भागात संपूर्ण आठवडाभर वाटप करण्याचा सूचना दिल्या आहेत. तर मालवाटपात ग्रामीण, शहरी भागात केलेल्या दुजाभावाबाबत लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निदान शहरी भागातदेखील ग्रामीणप्रमाणेच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

कोरोना महामारीचा सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड वेगाने संसर्ग वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिकच वाढत आहे. साहजिकच जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासन ठोस उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनसारख्या उपाययोजनादेखील हाती घेतल्या आहेत. जिल्हा पुरवठा विभागानेदेखील जिल्ह्यातील रेशनच्या माल वितरणाबाबत दुकानदारांना नवीन गाइड लाइन्स जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिल्या आहेत. शहरी भागातील रेशन दुकाने सोमवार ते गुरुवार सकाळी सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामीण भागात ही दुकाने संपूर्ण आठवडाभर नियोजित वेळेत म्हणजे सकाळी आठ ते एक अशी चालू ठेवावीत. अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे सूचित केले आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील दुकान मालकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याची सूचना आदेशात दिली आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त ऑनलाइन पेमेंटवर भर देण्याचेदेखील नमूद केले आहे. असे असले तरी माल वितरणाबाबत पुरवठा विभागाने शहरी व ग्रामीण असा दुजाभाव केला आहे. कारण शहरास चार दिवस तर ग्रामीणसाठी संपूर्ण आठवडा दिला आहे. वास्तविक शहरातील लाभार्थीदेखील मोलमजुरी करून आपला जीवन चरितार्थ चालवत असतात. साहजिकच या वेळी शेतावर कामाला असल्यामुळे इकडे वेळेवर रेशन आणू शकत नाही. यामुळे याबाबत फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

शिवभोजन थाळीबाबतही सूचना

राज्य शासनाने समाजातील गरीब घटकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीबाबतही पुरवठा विभागाने नवीन सूचना जारी केल्या आहेत. केंद्रांवरीलही सेवा पार्सलद्वारेच लाभार्थ्यांना देण्यात यावी. यासाठी संबंधित लाभार्थींची मोबाइलने फोटो, आधारकार्ड नोंदणी करून लगेच पार्सल द्यावे. कुठल्याही परिस्थितीत केंद्रामध्ये लाभार्थ्यास जेवण देऊ नये. असे आढळून आले तर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. गर्दी होणार नाही याचीदेखील संचालकांनी दक्षता घ्यावी आदी सूचना आहेत.

खापर परिसरात मोबाइल सेवेला अडचण

खापर : येथे व परिसरातील बी.एस.एन.एल. टेलिफोन व मोबाइल सेवा तीन दिवसांपासून बंद असल्याने बँकिंग व इतर व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

खापर परिसरात बी.एस.एन.एल. या कंपनीची टेलिफोन व मोबाइल सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर असून इतर कंपन्यांचा कॉलिंग दर व बी.एस.एन.एल.च्या कॉलिंग दरात बरीच तफावत असल्याने बहुसंख्य ग्राहक बी.एस.एन.एल.चे मोबाइल सिम वापरत असून थ्रीजी सेवा चांगली मिळत असल्याने अनेकांचा कल हा या शासकीय कंपनीकडेच आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून बी.एस.एन.एल.ची सेवा पूर्णतः बंद असल्याने ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत असून सेवा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.

खापर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने या बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकांची मोठी पंचाईत झाली असून पैसे भरणे व काढण्याचे व्यवहार थांबून गेले आहेत.

येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेची अत्यंत दैनावस्था झाली असून याकडे कुणीही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील शाखेला तब्बल पंधरा दिवसांपासून कुलूप लागलेले असून शाखा कधी उघडेल हेही निश्चित माहीत नसल्याने ग्राहकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

येथे बदलीवर दिलेले शाखा व्यवस्थापक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बँक बंदच आहे, कारण शाखेत एक शाखा व्यवस्थापक, एक कॅशियर व एक शिपाई अशा तीनच कर्मचाऱ्यांवर बँक सुरू असताना शाखा व्यवस्थापक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर, शाखेत दोनच कर्मचारी राहिले. त्यातही दुसरा कर्मचारीदेखील आजारी झाल्यानंतर येथील शाखा बंद करण्यात आली असून तब्बल पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही शाखेचे कुलूप जैसे थे असून येथील शाखेत बदली कर्मचारीसुद्धा येत नसल्याने पगाराची खाती असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत तर विविध शासकीय योजनांतील अनुदान यासह व्यापारी वर्गातील दररोजचे व्यवहार प्रभावित झालेले असून मध्येच आलेल्या सुट्ट्यांमुळे जनतेचा पैसा बैंकेत असूनही तो काढता येत नसल्याने जनता पूर्ण हवालदिल झाली असून याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी त्रस्त जनता करीत आहे.